Coronavirus: इराणमधून ५२ विद्यार्थ्यांची केली सुटका

इराणमधून सुटका झालेल्या एकूण भारतीयांची संख्या ३८९ झाली आहे.

52 student returned from iran
Coronavirus: इराणमधून ५२ विद्यार्थ्यांची केली सुटका

इराणमध्ये करोनाच्या विळख्यात सापडलेल्या ५२ भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशात आणले. यामध्ये एका शिक्षकाचा समावेश आहे. असे मिळून एकूण ५३ जणांना भारतात आणले. याबाबतची माहिती परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी माहिती दिली. दरम्यान, आता इराणमधून सुटका झालेल्या भारतीयांची संख्या आता ३८९ झाली आहे.

“इराणमधून ५३ भारतीयांची चौथी तुकडी भारतात परतली आहे. यामध्ये ५२ विद्यार्थी आणि एका शिक्षकाचा समावेश आहे. इराणची राजधानी तेहरान आणि शिराज या शहरांमधून या विद्यार्थ्यांची सुटका करण्यात आली आहे. यामुळे इराणमधून सुटका झालेल्या एकूण भारतीयांची संख्या ३८९ झाली आहे,” असे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले. भारतीयांच्या सुटकेसाठी प्रयत्न करणाऱ्या इराणमधील भारतीय दुतावास आणि इराणच्या उच्चाधिकाऱ्यांचे परराष्ट्र मंत्र्यांनी आभार मानले आहेत.


हेही वाचा – पुण्यात करोनाचा धसका, संचारबंदीचा प्रस्ताव; ३ दिवस तुळशीबाग बंद

दरम्यान, भारतात करोनाग्रस्तांची संख्या ११० वर गेली आहे. याबाबतची अधिकृत माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या mohfw.gov.in यासंकेतस्थळावर देण्यात आली आहे. देशात महाराष्ट्रामध्ये सर्वांत अधिक ३३ करोनाग्रस्त आहेत. दरम्यान, भारतात करोनाला आपत्ती घोषित करत साथरोग प्रतिबंध कायदा (Epidemic Diseases Act) लागू करण्यात आला आहे.