Monday, September 27, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश देशात कोरोनाचा कहर नियंत्रणात; जुलैनंतर सर्वात कमी बाधितांची आज नोंद

देशात कोरोनाचा कहर नियंत्रणात; जुलैनंतर सर्वात कमी बाधितांची आज नोंद

भारतात आतापर्यंत ७९ लाखांहून अधिकांना कोरोना विषाणूची लागण

Related Story

- Advertisement -

देशात कोरोनाचा कहर कमी होताना दिसतोय. भारतात आतापर्यंत कोरोना विषाणूची लागण ७९ लाखांहून अधिक लोकांना झालेली असली तरी १ लाख १९ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यासह या आजारातून बरे होणाऱ्यांची संख्याही सतत वाढत आहे. मंगळवारी सकाळी आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे ३६ हजार ४६९ नवीन रुग्ण आढळले आहेत तर यावेळी ४८८ लोक या जीवघेण्या विषाणूचे बळी ठरले आहेत.

- Advertisement -

गेल्या काही महिन्यांत (जुलै महिन्यानंतर) पहिल्यांदा असे घडले की बाधितांची संख्या ४० हजारांच्या खाली गेली आहे तर सलग दुसर्‍या दिवशी मृत्यूची संख्या ५०० पेक्षा कमी असल्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान सोमवारी, ४८० लोकांनी आपला जीव गमावला.

यासह, देशात कोरोना बाधितांची संख्या वाढून ती ७९ लाख ४६ हजार ४२९ वर पोहोचली आहे, तर आतापर्यंत १ लाख १९ हजार ५०२ लोकांचा कोरोनामुळे जीव गेला आहे. सध्या भारतात ६ लाख २५ हजारांहून अधिक रूग्णांवर उपचार सुरू आहेत तर  ७२ लाखांहून अधिक लोकांनी कोरोनावर मात केली असून ते रूग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. गेल्या २४ तासांत या आजारापासून ६३ हजार ८४२ लोक बरे झाले आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून दररोज येणाऱ्या नवीन रूग्णांची संख्या बरे झालेल्या रूग्णांपेक्षा कमी आहे. यामुळे, अॅक्टिव्ह रूग्णांमध्ये घट झाली आहे.

- Advertisement -

देशात कोरोनाबाधित रूग्ण निदर्शनात येण्यासाठी कोरोना चाचणी अद्याप सुरूच आहे. २६ ऑक्टोबरपर्यंत एकूण १० कोटी ४४ लाख २० हजार ८९४ जणांचे नमुने तपासण्यात आले तर गेल्या २४ तासात ९ लाख ५८ हजार ११६ कोरोना चाचण्या झाल्याची माहिती ICMR ने दिली.


राज्य सरकारचा मोठा निर्णय, कोरोना चाचणी आता फक्त ९८० रुपयांत!

- Advertisement -