घरदेश-विदेशदेशात २४ तासांत ५४ हजारांहून अधिक कोरोनाचे नवे रूग्ण; मात्र Active रूग्णांच्या...

देशात २४ तासांत ५४ हजारांहून अधिक कोरोनाचे नवे रूग्ण; मात्र Active रूग्णांच्या संख्येत घट

Subscribe

गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे ५४ हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळले

मंगळवारी कोरोना बाधितांच्या दैनंदिन रूग्णामध्ये घट झाल्यानंतर बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीत किंचित वाढ झाली आहे. दरम्यान, नव्याने आलेल्या बाधिताच्या तुलनेत अद्याप बरे होणार्‍या लोकांची संख्या जास्त आहे, ज्यामुळे कोरोनाची अॅक्टिव्ह रूग्ण सातत्याने कमी होत आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील कोरोनाच्या अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या ही एकूण बाधितांपैकी केवळ ९.६७ टक्के आहे. गेल्या २४ तासांत देशभरात अॅक्टिव्ह रूग्णांमध्ये घट झाली असून, आता देशात कोरोनाची अॅक्टिव्ह रूग्ण संख्या ७ लाख ४० हजार ९० इतकी आहे.

- Advertisement -

देशात कोरोनाच्या नव्या रूग्णांमध्ये सातत्याने घट होत आहे तर कोरोनामधून बरे होणाऱ्यांची रूग्णांची संख्याही नव्या संक्रमित रूग्णांपेक्षा खूपच जास्त आहे. गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे ५४ हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आतापर्यंत देशात बाधितांचा आकडा हा ७६ लाख ५२ हजार १०८ वर पोहोचला आहे. तर गेल्या २४ तासात ७१७ जणांचा जीव कोरोनामुळे गेला आहे. त्यामुळे आतापर्यंत एकूण १ लाख १५ हजार ९१४ जणांचे प्राण कोरोनामुळे गेल्याची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

तर आतापर्यंत ६७ लाख ९५ हजाराहून अधिकांना कोरोनावर मात केली आहे तर दिवसभरात ६१ हजार ७७५ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.


Good News: लवकरच येणार कोरोनाची लस; डिसेंबरपर्यंत Moderna लसीला मिळणार मंजूरी
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -