घरCORONA UPDATEकोरोना विषाणू मास्क, चलनी नोटा आणि प्लास्टिकवर 'एवढा' वेळ जिवंत राहतो!

कोरोना विषाणू मास्क, चलनी नोटा आणि प्लास्टिकवर ‘एवढा’ वेळ जिवंत राहतो!

Subscribe

कोरोना विषाणू लाकूड व कापडावर एक दिवस सक्रिय राहतो. तर काच आणि नोटांवर चार दिवस जिवंत राहतो.

कोरोना विषाणूपासून बचाव व्हावा म्हणून लोक मास्कचा वापर करतात. मात्र, या मास्कवर कोरोनाचा विषाणू किती काळ जिवंत राहतो हे तुम्हाला माहिती आहे का? कोरोना विषाणू मास्कच्या बाह्य पृष्ठभागावर तब्बल एक आठवडा जिवंत राहू शकतो. तर चलनी नोटा, स्टेनलेस स्टील आणि प्लास्टिकच्या पृष्ठभागावर बरेच दिवस जिवंत राहू शकतो. तथापि, सॅनिटायझर, साबणाने सतत हात धुतल्याने कोरोना विषाणू दूर केला जाऊ शकतो. कोविड-१९ वरील अभ्यासावरुन हे उघड झालं आहे. हाँगकाँगच्या साउथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या माहितीनुसार, हाँगकाँग युनिव्हर्सिटीच्या संशोधकांना त्यांच्या संशोधनाच्या खोलीच्या तपमानात विविध भागांवर कोविड -१९ चा विषाणू आढळला. कोरोना विषाणू लाकूड व कापडावर एक दिवस सक्रिय राहतो. तर काच आणि नोटांवर चार दिवस जिवंत राहतो.


हेही वाचा – पाकिस्तानमध्ये PPE साठी आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांना अटक

- Advertisement -

स्टेनलेस स्टील आणि प्लास्टिकवरुन कोरोना विषाणू पूर्ण नष्ट होण्यास चार ते सात दिवस लागले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, संशोधकांच्या म्हणण्यानुसार, कोरोनाचा विषाणू मास्कच्या बाह्य पृष्ठभागावर सात दिवस सक्रिय राहिला. म्हणून जेव्हा आपण मास्क वापरता तेव्हा आपण वरच्या पृष्ठभागास अजिबात स्पर्श करु नये हे फार महत्वाचं आहे. यामुळे आपल्या हातून कोरोनाचा संसर्ग तोंड आणि डोळ्यांना होऊ शकतो. हाँगकाँग विद्यापीठाच्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या लिओ पून लिटमन मलिक पेरिस यांनी सांगितलं की अनुकूल परिस्थितीत हा विषाणू बराच काळ जिवंत राहतो. तथापि, प्रमाणित कीटकनाशकांद्वारे देखील कोरानाचा विषाणू सहजपणे नष्ट करता येतो. इतर पृष्ठभागांवरील विषाणू कालांतराने वेगाने नष्ट होत असल्याचे संशोधकांनी नोंदवलं आहे. ते म्हणाले की, हे संशोधन सुरक्षेची खबरदारी घेत करण्यात आलं आहे. संक्रमित पृष्ठभागाच्या संपर्कात येऊन एखाद्या व्यक्तीला लागण होण्याची शक्यता किती आहे हे अद्याप अस्पष्ट आहे.

नेचर जर्नलमध्ये गेल्या महिन्यात प्रसिद्ध झालेल्या अमेरिकन संशोधकांच्या अहवालात कोविड -१९ च्या वेगवेगळ्या पृष्ठभागावर कोरोनाचा विषाणू जिवंत राहतो असं म्हटलं होतं. विषाणू प्लास्टिक आणि स्टीलच्या पृष्ठभागावर ७२ तास तर तांब्याच्या पृष्ठभागावर २४ तास जिवंत राहिला असं म्हटलं होतं. या विषाणूपासून बचाव करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे वारंवार हात धुणे. तसेच आपण किमान तोंडाला आणि डोळ्यांना कमीतकमी स्पर्श केला पाहिजे. हे संसर्गाचे मुख्य कारण आहे, असं संशोधकांनी सांगितलं.

- Advertisement -

हेही वाचा – “भारताने औषधाची मदत केली तर ठीक, नाही तर…”, ट्रम्प यांनी दिला भारताला इशारा


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -