घरदेश-विदेशcoronavirus: फ्रान्सपाठोपाठ अमेरिकेतही कोरोनाच्या पाचव्या लाटेची भीती, WHO चिंतेत

coronavirus: फ्रान्सपाठोपाठ अमेरिकेतही कोरोनाच्या पाचव्या लाटेची भीती, WHO चिंतेत

Subscribe

या आठवड्यात २९ प्रांतांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण

जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना विषाणू पुन्हा एकदा चिंतेचा विषय ठरतोय. फ्रान्सनंतर अमेरिकेतही कोरोनाची पाचवी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दोन महिन्यांनंतर या देशांतील बहुतेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या मोठ्याप्रमाणात वाढतेय. यात उत्तरेकडील आणि पर्वतीय प्रदेशांत सर्वाधिक रुग्ण आहेत.

जॉन हाफकिंस युनिर्व्हसिटीच्या शुक्रवारच्या आकडेवारीनुसार, गेल्या आठवड्यात २९ प्रांतांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या आधीच्या आठवड्यापेक्षा जास्त होती. एक महिन्यापूर्वी, केवळ १२ प्रांतांमध्ये प्रकरणे वाढत होती. यावर तज्ञांनी सांगितले की, २३ प्रांतातील रुग्णालयांमध्ये आठवड्याभरापूर्वीच्या तुलनेत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. तज्ज्ञांकडून या वाढत्या रुग्णसंख्येमागे अनेक कारणं सांगितली जात आहे. यामध्ये विषाणूच्या प्रसारासाठी अनुकूल हवामान, प्रतिकारशक्ती कमी होणे आणि लसीकरण न केलेले लोक यांचा समावेश होतो. मात्र अमेरिकेत कोरोनाचे संकट सध्यातरी कायम राहणार असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

- Advertisement -

युरोपातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येवर WHO ने व्यक्त केली चिंता

जिनिव्हा येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) प्रमुख टेड्रोस अधानोम घेब्रेयेसुस यांनी शुक्रवारी युरोपमध्ये वाढत्या कोरोना रुग्णसंख्येवर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, युरोपात कोरोना महामारी सुरु झाल्यापासून गेल्या आठवड्यात पहिल्यांदाच सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. कोरोना संसर्गाची सुमारे २० लाख नवीन प्रकरणे समोर आली आहेत, तर २७ हजार लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, लसीकरणाचे उद्दिष्ट गाठलेल्या किंवा अगदी जवळ असलेल्या देशांमध्येही कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढतेय.

चीनच्या २१ प्रांतांमध्ये वाढतेय कोरोना रुग्णसंख्या

चीनमध्ये नुकताच झालेला कोरोनाचा विस्फोट शनिवारपर्यंत २१ प्रांत आणि प्रदेशांमध्ये पोहोचला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शुक्रवारी चीनमध्ये ७५ नवीन प्रकरणे समोर आली आहेत.

- Advertisement -

जर्मनीत रुग्णसंख्या ५० हजारांच्या पुढे

जर्मनीत गेल्या २४ तासांत कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या पुन्हा ५० हजारांच्या पुढे गेली आहे. दरम्यान जर्मनीचे आरोग्यमंत्री जेन्स स्पॅन यांनी वाढत्या रुग्णसंख्येवर चिंता व्यक्त करत संसर्ग रोखण्यासाठी अतिरिक्त उपायांचा अवलंब करण्यावर भर दिला. देशात २३५ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान चान्सलर अँजेला मर्केल यांनी लसीकरण न केलेल्या लोकांना लवकरात लवकर लस घेण्याचे आवाहन केले आहे.

रशियात मृतांची विक्रमी पातळी

रशियात दैनंदिन मृत्यूच्या संख्येने पुन्हा एकदा विक्रमी (१२४१) पातळीवर गाठली आहे. देशातील ३९,२५६ लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली आहेत तर एकूण बाधितांची संख्या ९३ लाखांवर पोहोचली आहे.

ब्राझीलमध्ये कोरोनाचा विस्फोट

ब्राझीलमध्ये शुक्रवारी कोरोनाची १४,५९८ नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली, त्यामुळे देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या २,१९,३९,१९६ वर पोहोचली आहे. याशिवाय २६७ मृत्यूंसह एकूण मृतांची संख्या ६.१० लाख झाली आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -