घरट्रेंडिंगCoronaVirus: जनजागृती करण्यासाठी रस्त्यावर उतरली कोरोना ऑटो!

CoronaVirus: जनजागृती करण्यासाठी रस्त्यावर उतरली कोरोना ऑटो!

Subscribe

देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊनची मुदत ३ मेपर्यंत वाढवली आहे. यादरम्यान लोकांना घराबाहेर पडून यासाठी अनेक कल्पना पोलिस किंवा इतर कर्मचारी करत आहेत. अशी एक भन्नाट कल्पना चेन्नईत लोकांसाठी केली आहे. त्यांनी रिक्षाला कोरोना व्हायरस सारख तयार करून घरातून लोकांनी बाहेर पडून नये असा संदेश देत ती पूर्ण शहरात ती रिक्षा फिरवत आहे.

coronavirus auto

- Advertisement -

या कोरोना व्हायरसबद्दल लोकांमध्ये जागरुकता वाढवण्यासाठी हेतू ही कल्पना केली आहे. या रिक्षेतून शहरातील लोकांना घरी राहण्याचे आणि गरज असल्यास बाहेर पडण्याचे आवाहन केले जात आहे. जेव्हा बाहेर पडाल तेव्हा तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे. ज्याने मास्क घातला नसेल त्याच्याकडून १०० दंड आकारला जाईल आणि त्याला ४ मास्क दिले जातील. या रिक्षाचा लूक कोरोना व्हायरसचा सारखा केला आहे.

लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर

तमिळनाडूमध्ये तिरुपुरमधील पोलिस अधिकारी सगळ्या लोकांनावर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करत आहेत. ड्रोनच्या साहाय्याने लोक नक्की घरी बसेल आहेत की नाही याची खात्री केली जात आहे. आतापर्यंत तमिळनाडूमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १ हजार ६८३वर पोहोचली आहे. त्यापैकी २० जणांचा मृत्यू झाला आहे. तर ७५२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तमिळनाडूत सर्वाधित रुग्ण चेन्नईमध्ये सापडले आहेत. चेन्नईत कोरोनाग्रस्तांची संख्या ४०० हून अधिक आहे.

- Advertisement -

हेही वाचा – पहिल्यांदाच ‘सीआरपीएफ पासिंग’ व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -