घरदेश-विदेशबांगलादेशात कोरोनाची दुसरी लाट; ७ दिवसांचा देशव्यापी लॉकडॉऊन

बांगलादेशात कोरोनाची दुसरी लाट; ७ दिवसांचा देशव्यापी लॉकडॉऊन

Subscribe

बांगलादेशने सोमवार, ५ एप्रिलपासून ७ दिवस दुसऱ्यांदा पूर्ण लॉकडाऊन लागू करण्याचा घेतला निर्णय

कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे बांगलादेशने पुन्हा देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला आहे. गेल्या एका महिन्यात बांगलादेशमध्ये कोरोनाबाधितांच्या वाढत्या आकड्यांमुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली. बांगलादेश सरकारच्या मते, सोमवारपासून आठवड्याभरासाठी हा लॉकडाऊन लागू करण्यात येईल. रस्ते वाहतूक आणि पूल मंत्री ओबेदुल कादीर यांनी शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाची नवी दूसरी लाट रोखण्यासाठी सरकारने ७ दिवसाचा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ओबेदुल कादीर यांनी शनिवारी सकाळी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बांगलादेशमध्ये ८ दिवसांचा लॉकाडाऊन करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. उद्या ५ एप्रिलपासून ७ दिवस हा लॉकडाऊन करण्यात आला आहे. या काळात देशातील सर्व कार्यालये आणि कोर्ट बंद राहणार आहेत. परंतु, उद्योग आणि मिल्स रोटेशनपद्धतीने सुरू राहणार असल्याचं कादीर यांनी सांगितले.

- Advertisement -

५ एप्रिलपासून दुसऱ्यांदा पूर्ण लॉकडाऊन

कोरोनाच्या संसर्गाच्या वाढत्या केसेसमुळे बांगलादेशमध्ये सोमवारपासून एक आठवड्याचा संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. बांगलादेशने सोमवार, ५ एप्रिलपासून ७ दिवस दुसऱ्यांदा पूर्ण लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या दरम्यान केवळ आपत्कालीन सेवांसाठी सूट देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. तर बांगलादेशात कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेता लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यावेळी दुसर्‍यांदा संपूर्ण लॉकडाऊन करण्यामागचा हेतू म्हणजे कोरोनाचा प्रसार रोखणे, असा असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या काही दिवसांत बांगलादेशात कोरोना बाधितांची संख्या सातत्याने वाढली आहे, याच पार्श्वभूमीवर शेख हसीना सरकारने देशात दुसऱ्यांदा संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. या आठवड्याभराच्या लॉकडाऊनमुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येवर सकारात्मक परिणाम होईल, अशी आशा बांगलादेश सरकारला आहे.

पुन्हा लॉकडाऊन करणारा आशियातील पहिला देश

कोरोनाच्या वाढत्या थैमानामुळे वाढलेली रुग्णसंख्या यामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संपूर्ण देशात लॉकडाऊन करणारा बांगलादेश हा आशिया खंडातील पहिला देश ठरला आहे. गेल्या आठवड्यात पंतप्रधान कार्यालयाने १८ कलमी मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गर्दी जमवण्यास बंदी घालण्यात आली होती. सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये कोणत्याही सामाजिक, राजकीय किंवा धार्मिक कार्यक्रमात लोकांच्या जमावावर बंदी घालण्यात आली होती. ५० टक्के प्रवाश्यांना घेऊन सुरक्षिततेचे नियम पाळण्याचे निर्देशही बस चालकांना बांगलादेशात देण्यात आले होते.

- Advertisement -

बांगलादेशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. दरम्यान, शुक्रवारी ६ हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले, तर ५० लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला. बांगलादेशात आतापर्यंत कोरोनाने झालेल्या मृतांची संख्या ९ हजारांहून अधिक होऊन त्यापार गेली आहे, बांगलादेशातील कोरोनाचा पहिला रूग्ण गेल्या वर्षी ८ मार्च रोजी आढळला. त्याच्या दोन आठवड्यानंतर बांगलादेशात संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -