घरताज्या घडामोडीखळबळ! आमदाराच्या कुटुंबातील चौघांना कोरोनाची लागण

खळबळ! आमदाराच्या कुटुंबातील चौघांना कोरोनाची लागण

Subscribe

कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत असून एका आमदाराच्या कुटुंबातील चौघांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. दरम्यान, मध्य प्रदेशात भोपाळ, इंदूर आणि उज्जैननंतर आता इतर जिल्ह्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत मध्य प्रदेशात कोरोनाग्रस्तांची संख्या ३ हजारहून अधिक आहे. तर १६५ जणांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, बुराहनपूरमधील अपक्ष आमदाराच्या कुटुंबियांना कोरोनाची लागण झाली आहे. तीन दिवसांपूर्वी आमदाराच्या भावाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांच्या घरातील सदस्यांसह त्यांच्या संपर्कात येणाऱ्यांना क्वॉरंटाईन करण्यात आले. त्याचप्रमाणे घरातील सर्वांची कोरोना चाचणी केली असता त्यातील चार जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

१६ नवे रुग्ण आढळले

बुरहानपूरमध्ये रविवारी ३ मे रोजी १६ नवे रुग्ण आढळले. यापैकी चार रुग्ण हे आमदारांच्या कुटुंबातील आहेत. येथील स्थानिक वृत्तपत्रानुसार, आमदारांच्या भावाला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्या पुतण्याला, सुनेला आणि ३ वर्षांच्या नातवाला देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण कशी झाली असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे. तसेच त्यांच्या प्रवासाच्या इतिहासाविषयी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडूनही माहिती घेतली जात आहे.

- Advertisement -

बुरहानपूरमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या ३४ वर गेली असून तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. तर पाच रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर कोरोनाची लागण झालेल्या लोकांमध्ये माजी नगरसेवक आणि त्यांच्या कुटुंबातील १० जणांचा समावेश आहे. तर दोन डॉक्टरांना देखील कोरोनाची बाधा झाली आहे.


हेही वाचा – CoronaVirus: देशात गेल्या २४ तासांत ३९०० नवे कोरोना रुग्ण; तर १९५ जणांचा मृत्यू


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -