घरCORONA UPDATEया वस्तूंवर कोरोना व्हायरस चार दिवसाहून अधिक काळ सक्रिय असतो

या वस्तूंवर कोरोना व्हायरस चार दिवसाहून अधिक काळ सक्रिय असतो

Subscribe

कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवण्याबरोबरच त्याला नष्ट करण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरू आहेत. पण अद्याप यात कोणालाही यश मिळालेले नाही. याचदरम्यान, हाँगकाँग विश्वविद्यालयातील संशोधकांनी कोरोना व्हायरस कागदाच्या नोटा, स्टेनलेस स्टील आणि प्लास्टीकवर चार दिवसाहून अधिक काळ सक्रिय असल्याचा दावा केला आहे.

कोरोना व्हायरस हा पृष्ठभागावर १२ तास जिवंत राहू शकतो असे जगभरातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पण हाँगकाँग मधील संशोधकांनी कोरोना काही ठराविक पृ्ष्ठभागांवर ७ दिवसाहून अधिक दिवस सक्रिय असल्याचे प्रयोगातून निदर्शनास आल्याचे सांगितले आहे. पण घरगुती वापरात येणाऱ्या किटकनाशक, ब्लीच, आणि साबणाच्या वापरामुळे त्याला नष्ट करणे शक्य असल्याचेही या संशोधकांनी म्हटले आहे. यामुळे वैद्यकिय विश्वासमोर नवीन आव्हान उभे राहीले आहे. चीनमधील चायना मॉर्निंग पोस्ट या वृत्तपत्राने याबद्दल वृत्त दिले आहे. तसेच विश्वविद्यालयाच्या आरोग्य विभागाचे लियो पून लिटमेन मलिक पीरिस यांनीही कोरोना व्हायरस अनूकूल परिस्थितीमध्ये अधिक काळ सक्रिय असतो. असे सांगितले आहे. नोटा, कागद व टिश्युपेपरवरही तो तीन तास सक्रिय असतो असेही संशोधकांनी सांगितले आहे. कपडे, लाकडावर कोरोना एक दिवस राहू शकतो. तर काच, कागद व प्लास्टीकवर सात दिवसांप़र्यंत सक्रिय असतो. पण या वस्तू सॅनिटाईझ केल्याने तो निष्क्रीय होतो. असेही संशोधकांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -