घरCORONA UPDATECorona: हैदराबादमधील कोरोना कार करतेय नागरिकांमध्ये जनजागृती

Corona: हैदराबादमधील कोरोना कार करतेय नागरिकांमध्ये जनजागृती

Subscribe

हैदराबादमध्ये कोरोना व्हायरसच्या आकाराची कार रस्त्यांवर फिरून लोकांमध्ये जनजागृतीचे काम करत आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात विविध प्रकारे त्याबाबत लोकांमध्ये जनजागृती केली जात आहे. अशीच आगळीवेगळी पद्धत हैदराबादमध्ये पाहायला मिळाली. येथील एका स्थानिक कार म्युझियमच्या मालकाने कोरोना व्हायरससारखी दिसणारी कार बनवली आहे. ही कार सध्या रस्त्यांवर फिरून नागरिकांमध्ये जनजागृतीचे काम करत आहे. ही वन सीटर कार असून यामध्ये १०० सीसीचे इंजिन आहे. तसेच ४० किमी चालण्याइतकी या कारची क्षमता आहे. काल ही कार हैदराबादच्या रस्त्यावर चालवण्यात आली.

- Advertisement -

जनजागृतीसाठी वापरणार ही कार 

हैदराबादमधील लोकांच्या आकर्षणाचे केंद्र बनलेल्या ‘सुधा कार’ म्युझियमचे मालक सुधाकर यांनी याबाबत सांगितले की, या कारमध्ये १०० सीसी इंजिन असून ही एक चारचाकी गाडी आहे. असे आगळेवेगळे कारचे मॉडेल बनवण्यासाठी आम्हाला साधारण दहा दिवसांचा कालावधी लागला. ही कार कोरोनाविषयी लोकांमध्ये जनजागृतीचे काम करेल. त्यांना घरात बसण्यासाठी प्रवृत्त करेल. यापूर्वीही ‘सुधा कार’ कंपनीने विविध आकाराच्या बाईक आणि कार बनवल्या आहेत. याआधी त्यांनी एड्ससंबंधी जनजागृती करण्यासाठी कंडोमच्या आकाराची बाईक बनवली होती. तर रस्त्यावरील अपघातात डोकं वाचवण्यासाठी हेल्मेटच्या आकाराचीही कार बनवली होती. तसेच धुम्रपानाविरोधात जनजागृतीसाठी सिगारेटच्या आकाराची बाईक बनवली होती, अशी माहितीही सुधाकर यांनी यावेळी दिली.

हेही वाचा –

औषध पुरवठा करण्याच्या निर्णयावर ट्रम्प खूश; मानले पंतप्रधानांचे आभार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -