घरदेश-विदेशदिल्लीत कोरोना रूग्णांचा आकडा १ लाख पार!

दिल्लीत कोरोना रूग्णांचा आकडा १ लाख पार!

Subscribe

आतापर्यंत शहरात ३ हजार ११५ लोकांचा मृत्यू

देशाची राजधानी दिल्लीमध्ये देखील कोरोनाचा कहर वाढू लागला आहे. दिलासादायक म्हणजे सोमवारी गेल्या काही दिवसांपेक्षा कोरोनाचे कमी रुग्ण आढळून आले आहेत. सोमवारी राजधानी दिल्लीत कोरोनाचे १ हजार ३७९ नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली त्यानंतर दिल्ली शहरात कोरोनाची लागण झालेल्या लोकांचा आकडा १ लाखांवर पोहोचला असून सध्या दिल्लीत कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख ८२३ झाला आहे.

- Advertisement -

यापैकी ७२ हजार ८८ रूग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सध्या २५ हजार ६२० अॅक्टिव्ह रूग्ण दिल्लीत आहेत. सोमवारी सोमवारी गेल्या काही दिवसांपेक्षा कोरोनाचे कमी रुग्ण आढळले असले तरी कोरोनामुळे ४८ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत शहरात ३ हजार ११५ लोकांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनामधून बरे झालेल्या रूग्णांना १४ दिवसानंतर प्लाझ्मा दान करण्यास प्रोत्साहित करण्याचे आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी रुग्णालयांना केले. मुख्यमंत्री म्हणाले की, दिल्लीत प्लाझ्मा बँक सुरू झाल्यानंतर गेल्या ४ ते ५ दिवसांत प्लाझ्माची मागणी वाढली आहे, परंतु प्लाझ्मा दान करणाऱ्यांची संख्या आहे.

- Advertisement -

निरोगी रूग्णांना असे करण्यास प्रोत्साहित करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयांना केले आहे. ते म्हणाले की, दिल्लीमध्ये कोविड -१९ च्या १५ हजार बेड आहेत त्यापैकी ५,१०० रूग्णांवर उपचार सुरू आहेत.


लवकरच प्लाझ्मा बँक तयार होणार, केजरीवाल यांची घोषणा!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -