Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE कोरोनाचा उद्रेक! देशात एका दिवसात ६८ हजार नवे रुग्ण, तर २९१ जणांचा...

कोरोनाचा उद्रेक! देशात एका दिवसात ६८ हजार नवे रुग्ण, तर २९१ जणांचा मृत्यू

Related Story

- Advertisement -

देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक चिंताजनक होत आहे. यातच आज ६८ हजाराहून अधिक नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे देशात कोरोनाची दुसरी लाट तयार झाली आहे. नुकतीच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नवीन आकडेवारी जाहीर केली. या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत ६८,०२० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर २९१ बाधितांचा मृत्यू झाला आहे. यातील ३२,२३१ नागरिक बरे होऊन घरी परतले आहेत. यातच रविवारी देखील ६२ हजार ७१४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहेत.

देशात सध्या १ कोटी २० लाख ३९ हजार ६४४ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आत्तापर्यंत १ कोटी १३ लाख ५५ हजार ९९३ नागरिक कोरोना संसर्गातून ठीक होऊन घरी परतले आहेत. देशात सध्या ५ लाख २१ हजार ८०८ अॅटिव्ह रुग्ण आहेत. तर आहे. देशातील ८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा दर सर्वाधिक आहे. यात महाराष्ट्र पहिल्या स्थानावर आहे.

- Advertisement -

याचपार्श्वभूमीवर देशात १६ जानेवारापासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. आत्तापर्यंत देशात ६ कोटी ५ लाख ३० हजार ४३५ नागरिकांना कोरोना लस देण्यात आली आहे. यातच १६ फेब्रुवारीपासून कोरोना लसीचा दुसरा डोस देण्यास सुरुवात झाली. मात्र तरी देखील देशात कोरोनाबाधितांची संख्या झपाड्याने वाढत आहे. त्यामुळे देशात लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला आहे. जगभरातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर भारताचा रिकव्हरी रेटच्या आकडेवारीत अमेरिकेनंतर येतो. तर कोरोनाबाधित मृतांच्या आकडेवारीत अमेरिका, ब्राझील, मेक्सिकोनंतर भारत चौथ्या क्रमांकावर आहे.


 

- Advertisement -