Friday, April 9, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE Coronavirus Cases India: ७ दिवसांत १४९ जिल्ह्यांमध्ये एकही कोरोना रुग्णाची नोंद नाही

Coronavirus Cases India: ७ दिवसांत १४९ जिल्ह्यांमध्ये एकही कोरोना रुग्णाची नोंद नाही

देशातील मृत्यूदर झाला कमी

Related Story

- Advertisement -

एकाबाजूला देशात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पण दुसऱ्या बाजूला देशातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण आढळत नसल्याचे दिलासादायक माहिती समोर आली आहे. आज सकाळी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी पत्रकार परिषद घेतली. यादरम्यान त्यांनी सांगितले की, ‘७ दिवसांमध्ये १४९ जिल्ह्यात एकही कोरोना रुग्ण आढळलेला नाही. तर १४ दिवसांत ८ जिल्ह्यात, २१ दिवसांत ३ जिल्ह्यात आणि २८ दिवसांत ६३ जिल्ह्यात एकाही कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झालेली नाही. तसेच आता देशातील मृत्यूदरही कमी होतोना दिसत आहे. सध्या देशातील मृत्यूदर १.२८ टक्के इतका आहे.’

- Advertisement -

आज केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची ग्रुप ऑफ मिनिस्टर (GoM)ची २४ वी बैठक पार पडली. या बैठकीत केंद्रीय मंत्री डॉ. एस जयशंकर, हरदीप सिंह पुरू आणि अश्विनी कुमार चौबे उपस्थितीत आहे. यादरम्यान पत्रकार परिषद घेऊन देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा दिला.

डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले की, टआतापर्यंत देशातील १ कोटी १९ लाख १३ हजार २९२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सुरुवातील रिकव्हरी रेट ९६ ते ९७ टक्क्यांवर होता, पण आता तो घसरून ९१.२२ टक्क्यांवर आला आहे. आता ०.४६ टक्के गंभीर रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे. २.३१ टक्के आयसीयूमध्ये आणि ४.५१ टक्के ऑक्सिजन बेड्सवाले रुग्ण आहेत. आता देशातील मृत्यूदर सातत्याने कमी होत असून सध्याचा मृत्यूदर १.२८ टक्के आहे.’

- Advertisement -

पुढे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, ‘८९ लाखांहून जास्त आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे आणि ५४ लाखांहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. तसेच २ कोटी ७५ लाख वृद्धांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. आतापर्यंत ९ कोटी ४३ लाखांपेक्षा जास्त लोकांचे लसीकरण पार पडले आहे.’


हेही वाचा – देशात कोरोनाचा विळखा घट्ट! लवकरच बाधितांच्या संख्येत भारत ब्राझीलला टाकणार मागे


 

- Advertisement -