घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटएक लाख लोकसंख्येमागे भारतात ७.१ कोरोनाबाधित रुग्ण; वाचा इतर देशांची आकडेवारी

एक लाख लोकसंख्येमागे भारतात ७.१ कोरोनाबाधित रुग्ण; वाचा इतर देशांची आकडेवारी

Subscribe

भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लाखांच्या वर पोहोचली आहे. मागच्या एका आठवड्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली. तरिही भारताची स्थिती जगातील इतर देशांच्या तुलनेत बरी असल्याचे आकडेवारीवरुन लक्षात येते. एक लाख लोकसंख्येमागे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोजली गेली तर भारताचा एव्हरेज जगातील इतर देशांपेक्षा कितीतरी चांगला असल्याचे समोर येत आहे.

आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, भारताची सरासरी इतर देशांपेक्षा चांगली आहेच. त्याशिवाय कोरोनापासून बरे होणाऱ्यांचा रिकव्हरी रेटदेखील इतर देशांपेक्षा चांगला आहे. भारताचा रिकव्हरी रेट ३८ टक्के आहे. याचा अर्थ १०० रुग्णांपैकी ३८ रुग्ण सध्या बरे होत आहेत.

- Advertisement -

चीनच्या वुहान प्रातांतून निघालेला कोरोना व्हायरस जगभरात पोहोचला असून अमेरिका, इटली, फ्रांस, स्पेन आणि युकेमध्ये त्याने थैमान घातले आहे. खरंतर हे देश विकसित देशांच्या गटात मोडतात. मात्र त्यांनी कोरोना समोर अक्षरशः गुडघे टेकले आहेत. अमेरिकेत अजूनही परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही. अमेरिकेत दर एक लाख लोकसंख्येमागे ४९४  कोरोनाबाधित रुग्ण आहेत. रशियामध्ये ही संख्या १९५ एवढी आहे.

या यादीत इतर देशांची परिस्थिती पाहू

स्पेन – ४९४ / प्रति लाख

- Advertisement -

इटली – ३७२ / प्रति लाख

युके – ३६१ / प्रति लाख

जर्मनी – २१० / प्रति लाख

फ्रांस – २०९ / प्रति लाख

तुर्की – १८० / प्रति लाख

ईराण – १४५ / प्रति लाख

ब्राझील – १०४ / प्रति लाख

कोरोना टेस्ट कारणीभूत आहे?

भारतात कोरोनाबाधितांची संख्या कमी असली तरी कोरोनाच्या टेस्ट कमी होत आहेत, त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी दिसत असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. मेक्सिको, बांगलादेश, इंडोनेशिया आणि इजिप्त या चार देशांनी लोकसंख्येच्या तुलनेत आपल्या पेक्षाही कमी टेस्ट केलेल्या आहेत. भारतात लोकसंख्येच्या तुलनेत फक्त ०.१५ टक्केच टेस्ट केल्या गेल्या आहेत. आता हळु हळु टेस्ट करण्यामध्ये गती येत आहे. आतापर्यंत भारतात एकूण २४ लाख टेस्ट केल्या गेल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -