घरCORONA UPDATECorona Update: देशात २४ तासात ४८,६६१ रूग्णांची नोंद; बळींचा आकडा ३२ हजारांवर!

Corona Update: देशात २४ तासात ४८,६६१ रूग्णांची नोंद; बळींचा आकडा ३२ हजारांवर!

Subscribe

कोरोना रूग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असला तरी दिलासादायक म्हणजे गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनावर मात करून ३६ हजार १४५ लोक पूर्णपणे बरे झाले आहेत

देशात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे आणि दररोज नवीन रूग्ण आढळण्याचे प्रमाण वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशभरात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी ८ ते रविवारी सकाळी ८ पर्यंत देशभरात कोरोनाची लागण झालेल्या एकूण ४८ हजार ६६१ नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामुळे देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या १३ लाख ८५ हजार ५२२ झाली आहे.

- Advertisement -

कोरोना संक्रमणामुळे लोक आपला जीव गमावत आहेत आणि मृत्यूची संख्याही वाढली आहे. आरोग्य मंत्रालया नुसार, २४ तासांत देशभरात कोरोनामुळे ७०५ लोकांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत देशात एकूण ३२ हजार ६३ जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना रूग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असला तरी दिलासादायक म्हणजे गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनावर मात करून ३६ हजार १४५ लोक पूर्णपणे बरे झाले आहेत. आतापर्यंत देशभरात एकूण ८ लाख ८५ हजार ५७६ लोक कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. देशातील कोरोनाचा रिकव्हरी रेट ६३.९१ टक्के झाला आहे. देशात सध्या कोरोनाची एकूण ४ लाख ६७ हजार ८८२ रूग्ण अॅक्टिव्ह आहेत.


Corona Live Update : महाराष्ट्रात ८ हजार ४८३ पोलीस कोरोनाबाधित

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -