घरCORONA UPDATECoronavirus Cases Today : देशातील कोरोना रुग्णसंख्या अन् मृतांची संख्येत वाढ; 4575...

Coronavirus Cases Today : देशातील कोरोना रुग्णसंख्या अन् मृतांची संख्येत वाढ; 4575 नवे रुग्ण, 145 मृत्यू

Subscribe

देशातील कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने चढ-उतार होत आहे. देशात कालच्या तुलनेत कोरोना रुग्णसंख्या अन् मृतांची संख्या वाढल्याचे पाहायला मिळाले. गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 4 हजार 575 नवे रुग्ण आढळून आले तर 145 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारच्या कोरोना रुग्णसंख्येचा विचार केला असता, मंगळवारी देशात 3 हजार 993 रुग्ण आढळले होते तर 108 मृत्यूची नोंद झाली होती. त्यामुळे कालच्या तुलनेत रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. तर सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. देशात आज सक्रिय रुग्णांची संख्या 46 हजार 962 इतकी कमी झाली आहे.

- Advertisement -

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशातील सक्रिया रुग्णांची संख्या ही 59 हजार 442 झाली आहे. तर कोरोनामुळे मृत झालेल्या रुग्णांची संख्या 5 लाख 15 हजार 335 वर पोहचली आहे. याशिवाय आतापर्यंत 4 कोटी 24 लाख 13 हजार 566 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी नव्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 5 हजारांपेक्षा कमी झाली आहे.

देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत नागरिकांना लसीचे 179 कोटी डोस देण्यात आले आहेत. यात मंगळवारी 18 लाख 69 हजार 103 डोस देण्यात आले. तर आतापर्यंत नागरिकांना 179 कोटी 33 लाख 99 हजार 555 लसीचे डोस देण्यात आले आहेत. दरम्यान आरोग्य कर्मचारी, कोरोना योद्धा आणि इतर आजारांनी ग्रस्त 60 वर्षांवरील लोकांना 2 कोटींहून अधिक (2,08,56,585) प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत.


Russia Ukraine War : McDonalds चे रशियातील 850 आऊटलेट्स बंद, हजारो कर्मचारी बेरोजगार?


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -