Coronavirus Cases Today : भारतात 50 हजारांपेक्षा कमी कोरोनाचे सक्रिय रुग्ण; 24 तासात 3,993 नवे रुग्ण, 108 रुग्णांचा मृत्यू

Coronavirus Cases Today India registers 3,993 new cases and 108 deaths in the last 24 hours Active cases stand at 49948
Coronavirus Cases Today : भारतात 50 हजारांपेक्षा कमी कोरोनाचे सक्रिय रुग्ण; 24 तासात 3,993 नवे रुग्ण, 108 रुग्णांचा मृत्यू

देशातील कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस मोठी घट होत आहे. यामुळे कोरोनाची तिसरी लाट पूर्णपणे कमी झाल्याचे म्हटले जातेय. देशात गेल्या 24 तासात भारतात कोरोनाचे 3,993 नवीन रुग्ण आढळले आहेत. यासह कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 50,000 पेक्षा कमी झाली आहे. तर 108 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी आदल्या दिवशी देशात कोरोनाचे 4,362 रुग्ण आढळून आले होते. तर 66 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, सक्रिय रुग्णांची संख्या 49,948 वर आली आहे. 108 कोरोना मृतांमुळे आतापर्यंत मृतांची संख्या 5,15,210 वर पोहोचली आहे. तर एकूण 42,40,6150 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

यामुळे 663 दिवसांत पहिल्यांदाच कोरोनाचे सर्वात कमी रुग्णांची नोंद झाली आहे. यापूर्वी 15 मे 2020 रोजी भारतात कोरोनाच्या 4,000 खाली रुग्णांची नोंदवली झाली होती, जेव्हा देशात 3,967 नवे कोरोना रुग्ण आढळले होते. तर दैनंदिन कोरोना रुग्ण सलग 30 दिवसांपासून एक लाखांपेक्षा कमी आहेत. तर सलग दुसऱ्या दिवशी नव्या कोरोना रुग्णांची संख्या 5,000 पेक्षा कमी झाली आहे. भारतात आता देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत 179.13 कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत.

मागील काही दिवसांपासून राज्यातही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. 18 एप्रिल 2020 पासूनची राज्यातील ही सर्वाधिक घट असलेली रुग्णसंख्या आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 225 नव्या कोरोनाबाधित आढळले असून एकही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. यापूर्वी 2 मार्चला राज्यात एकही मृत्यूची नोंद झालेली नव्हती. त्यानंतर सोमवारी पुन्हा एकदा दुसऱ्यांदा राज्यात एकही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. राज्यातील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या 78 लाख 69 हजार 38वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत 1 लाख 43 हजार 740 जणांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यात 3 हजार 472 कोरोना रुग्ण सक्रिय आहेत.