Coronavirus Cases Today : देशातील कोरोना मृतांची संख्या वाढली; 24 तासात 255 मृत्यू , 4194 नवे रुग्ण

India Coronavirus Update today 1270 new covid cases 31 death in last 24 hour
India Coronavirus Update : देशातील कोरोना रुग्णसंख्या 10.0 टक्क्यांनी घटली, 1270 नवे रुग्ण, 31 मृत्यू

देशातील कोरोनाची तिसरी लाट झपाट्याने कमी होत असल्याचे दिसून येत आहे. सध्या देशात कोरोनाचे चार हजारांहून कमी रुग्ण आढळून येत आहेत. परंतु गेल्या तीन ते चार दिवसांपासून सतत कमी होणारी मृतांची संख्या मात्र वाढतेय. गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 4 हजार 194 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 255 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 6 हजार 208 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे कालच्या तुलनेत रुग्णसंख्या कमी झाली असली तरी मृतांची संख्या वाढली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 42 हजार 219 वर आली आहे. तर कोरोनामुळे आत्तापर्यंत 5 लाख 15 हजार 714 झाली आहे. आत्तापर्यंत देशात 4 कोटी 24 लाख 26 हजार 328 रुग्ण कोरोना संसर्गमुक्त झाले आहेत.

देशातील कोरोना लसीकरण मोहिमेअंतर्गत आत्तापर्यंत 179 कोटी लोकांना कोरोनाविरोधी लसीचे डोस देण्यात आले आहेत. तर कालपर्यंत 16 लाख 73 हजार 515 डोस देण्यात आले होते. त्यानंतर आतापर्यंत 179 कोटी 72 लाख 515 डोस लसीचे डोस देण्यात आले आहेत. याशिवाय देशातील आरोग्य कर्मचारी, कोरोना योद्धा आणि इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना 2 कोटी 10 लाख 55 हजार 540 इकत्या प्रतिबंधात्मक लस देण्यात आल्या आहेत.