Coronavirus : कोरोना विषाणुवर डायबिटीजचे औषध ठरु शकते गुणकारी, संशोधन सुरु

Coronavirus Common Diabetes Drug ‘Metformin’ May Help Treat COVD-19 Related Lung Inflammation says Study
Coronavirus : कोरोना विषाणुवर डायबिटीजचे औषध ठरु शकते गुणकारी, संशोधन सुरु

कोरोना संसर्गाचा सामना करण्यासाठी जगभरात नवनवीन उपचार पद्धती शोधून काढली जात आहे. त्याचबरोबर आता कोरोना रुग्णांना दिल्या जाणाऱ्या औषधांवरही अभ्यास सुरु आहे. कोरोना विषाणूचे समुळ नष्ट करण्यासाठी जगभरातील अनेक तज्ज्ञ रात्रांदिवस मेहनत घेत असले तरी अद्याप या विषाणुवर प्रभावी औषध सापडले नाही. त्यामुळे सध्या आहे त्याच औषधांमधून प्रभावी औषध शोधण्याचे काम आरोग्य तज्ज्ञ करत आहेत. दरम्यान अशाच एका संशोधनात कोरोना विषाणुच्या संसर्गावर आता डायबिटीजचे औषधही गुणकारी ठरत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांच्या उपचारांसाठी डायबिटीजवरील औषधांत आशेचा किरण दिसला आहे. त्यामुळे हे औषध आता कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी उपयुक्त ठरु शकते.

संशोधकांच्या म्हणण्यानुसार, रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी वापरण्यात येणारे मेटफार्मिन नावाचे औषध पल्मोनरी म्हणजे फुफ्फुसांना होणारा संसर्ग रोखू शकते. कारण सर्वाधिक रुग्णांनामध्ये फुफ्फुसांना कोरोना संसर्ग झाल्यास मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे.

कोरोनाबाधित उंदरांवर करण्यात आले संशोधन

अमेरिकेच्या कॅलिफोर्निया विद्यापीठीच्या संशोधकांनी कोरोना संसर्गाला कारणीभूत ठरलेल्या सार्स-कोव्ह-२ संक्रमित उंदरांवर या औषधाचा प्रयोग केला. या प्रयोगानंतरच कोरोना विषाणुवर डायबिटीजचे औषध गुणकारी ठरु शकते असा दावा करण्यात आला आहे. टाईप २ डायबिटीज रुग्णांना प्रथम उपचार करताना मेटफॉर्मिन औषधांचा वापर केला जातो. हे औषध यकृतातील ग्लुकोजचे उत्पादन कमी करण्याबरोबरचं रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करत आहे. यामुळे इन्सुलिनला चांगला प्रतिसाद मिळत आहे. संशोधकांनी एक्युट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम (ARDS) पीडित उंदरांवर हा अभ्यास केला आहे.

संशोधनाात मेटफॉर्मिन औषध प्रभावी असल्याचे आढळले

एआरडीएस (ARDS) ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये रुग्णाच्या फुफ्फुसांमध्ये द्रव जमा पदार्थ झाल्यामुळे श्वास घेण्यास अडचण येतात तसेच शरीरातील इतर अवयवांना ऑक्सिजन मिळत नाही. ही स्थिती कोरोनाबाधिक रुग्णासाठी प्राणघातक ठरु शकते. ऑनलाईन जर्नल इम्यूनिटीमध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासाच्या निष्कर्षांनुसार, मेटफॉर्मिन हे औषध उंदरांना एआरडीएसपासून बचाव करण्यासाठी प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. यावर संशोधकांनी असे सांगितले की, या औषधामुळे तंत्रिका तंत्राच्या आजारावर उपचार करण्याची क्षमता देखील असू शकते.


SIM-Swap म्हणजे नेमक काय? ज्याने बँक अकाउंट केले जातेय मिनिटात खाली, कशी टाळाल ही फसवणूक