घरCORONA UPDATEcoronavirus : कोरोनामुक्त लहान मुलांना नव्या आजाराचा धोका, २ ते ६ आठवडे...

coronavirus : कोरोनामुक्त लहान मुलांना नव्या आजाराचा धोका, २ ते ६ आठवडे काळजी घ्या

Subscribe

देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. मात्र कोरोनाबाधित रुग्णसंख्येत घट होत असली तरी मृतांच्या आकड्यात कोणताही घट झालेली नाही. अशातच कोरोनाची दुसरी लाट ओसरत नाही तोवर आरोग्य तज्ज्ञांकडून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा दिला जात आहे. परंतु या तिसऱ्या लाटेत सर्वाधिक धोका लहान मुलांना असल्याचा सांगितले जात आहे. त्यामुळे लहान मुलांच्या बचावासाठी केंद्रीय आरोग्य यंत्रणेकडून योग्यती पाऊले उचलली जात आहे.

कोरोना नसला तरी लक्षणे कोरोनाप्रमाणेच 

यातच कोरोनातून बरे होणाऱ्या लहान मुलांमध्ये एका नव्या आजाराची लक्षणे आढळत आहे. यावर नीति आयोगाचे सदस्य डॉ. वीके पॉल सांगतात, कोरोनामुक्त होणाऱ्या लहान मुलांमध्ये काही नवीन लक्षणे आढळत आहे. तसेच बऱ्याच कोरोनामुक्त लहान मुलांना २ ते ६ आठवड्यांच्या कालावधीत ताप, त्वचेवर खाज येणे, डोळे लाल होणे, जुलाब, उलट्या आणि श्वास घेण्यास त्रास होणे यांसारखी लक्षणे दिसून आली. तसेच अशा बाधित मुलांना कोरोनाचा संसर्ग आढळून आला नाही, परंतु त्यांच्या आढळलेली ही लक्षणे अगदी कोरोनाप्रमाणेच आहेत. अशा लक्षणांना Multi System Inflammatory Syndrome असं म्हटलं जातं. त्यामुळे कोरोनामुक्त होणाऱ्या लहान मुलांची २ ते ६ आठवडे अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.

- Advertisement -

२ टक्के कोरोनाबाधित मुले रुग्णालयाच भर्ती 

तसेच एकूण कोरोनाबाधित लहान मुलांपैकी केवळ 2 टक्के मुलांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासत आहे. या मुलांमध्ये काही लक्षणं प्रामुख्यानं पाहायला मिळत आहेत, ती म्हणजे, ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास. या लक्षणांवर उपचार केले जात आहेत, असंही डॉ. पॉल यांनी सांगितलं.


उत्तरप्रदेशात गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट, सात जणांचा मृत्यू तर १४ हून अधिक जखमी


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -