घरताज्या घडामोडीLive Update: विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन यंदा नागपूर ऐवजी मुंबईत होणार- राज्य मंत्रीमंडळाचा...

Live Update: विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन यंदा नागपूर ऐवजी मुंबईत होणार- राज्य मंत्रीमंडळाचा निर्णय

Subscribe

विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन यंदा नागपूर ऐवजी मुंबईत होणार आहे. राज्य मंत्रीमंडळाने हा घेतला निर्णय घेतला आहे. विधीमंडळाचे २०२० मधील चौथे अधिवेशन आहे.


 

- Advertisement -

Pfizer-BioNTech लसीच्या वापराला ब्रिटनने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांना ही लस लवकरच उपलब्ध होणार आहे. Pfizer-BioNTech च्या लसीच्या वापराला मंजुरी देणारा ब्रिटन जगातील पहिला देश ठरला आहे.

- Advertisement -

भाजपच्या नेत्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रकृती बिघडल्यामुळे कार्यकर्त्यांकडून चिंता व्यक्त केली जात होती. पण, आता खुद्द पंकजा मुंडे यांनी ‘आपली कोरोनाची चाचणी ही निगेटिव्ह आली आहे’, अशी माहिती दिली आहे. पंकजा मुंडे यांनी आपल्या सर्दी आणि ताप आला आहे, त्यामुळे आयसोलेट होत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर त्यांनी आज कोविडची चाचणी केली असता रिपोर्ट हा निगेटिव्ह आला आहे.


विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ ते ९ डिसेंबर या कालावधीत मुंबईतच होण्याची शक्यता आहे. ७,८ आणि ९ डिसेंबर असे तीन दिवस अधिवेशन होण्याची शक्यता आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली गेल्याने अधिवेशन पुढे ढकलण्याचा विचार होता. पण रुग्णसंख्या आटोक्यात असल्यामुळे ठरलेल्या तारखेनुसार अधिवेशन होण्याची शक्यता आहे.


शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर उद्या अँजिओप्लास्टी होणार आहे. आजच मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल होणार असल्याची माहिती मिळतेय.


कोरोनाचा प्रादुर्भाव देशात अद्याप सुरूच आहे. गेल्या 24 तासात देशात 36,604 नव्या कोरोना रूग्णांचे निदान झाले. त्यामुळे हा आकडा वाढून 94,99,414 वर पोहोचला आहे. तर गेल्या 24 तासात 501 जणांचा कोरोनामुळे बळी गेला. तर दिलासादायक बाब म्हणजे आत्तापर्यंत 89,32,647 लोकांना डिस्चार्ज मिळाला आहे.


उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर आहेत. आज आदित्यनाथ शेअर मार्केटला भेट देणार आहेत. नंतर चित्रपट उद्योगातील दिग्गजांशी चर्चा करणार आहे. फिल्मसिटी गुंतवणूकदारांची मतं जाणून घेण्यासाठी प्रतिष्ठीत उद्योगपतींसोबत विचारविनिमय करणार आहेत. तर दुपारी 2.30 वाजता आदित्यनाथ पत्रकार परिषद घेणार असून दुपारी 4 वाजता यूपीसाठी रवाना होणार असल्याची माहिती मिळतेय.


बॉलिवूड अभिनेता आणि गुरदासपूरचे भाजप खासदार सनी देओल यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे, अशी माहिती हिमाचल प्रदेशचे आरोग्य सचिव अमिताभ अवस्थी यांनी मंगळवारी रात्री उशीरा दिली. तर सनी देओल गेल्या काही महिन्यांपासून कुल्लू येथे वास्तव्यास होते, असे त्यांनी सांगितले. (सविस्तर वाचा)


उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी ते बॉलिवूडच्या अभिनेते आणि निर्मात्यांशी तसेच महाराष्ट्र आणि मुंबईतील उद्योजकांशी चर्चा करणार आहेत. उत्तर प्रदेशात निर्माण होणाऱ्या फिल्मसिटीत योगी आदित्यनाथ यांना मुंबईचं वैभव असलेल्या बॉलिवूडला न्यायचं आहे. त्यांच्या याच कृतीला मनसेने आता होर्डिंगच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे. ‘अपयशी राज्यातील बेरोजगारी लपवण्यासाठी मुंबईतील उद्योग पळवण्यासाठी आलेला “ठग”, ‘कहा राजा भोज…और कहा गंगू तेली…’ अशा आशयाचे होर्डिंग मनसेकडून मुंबईत लावण्यात आल्याचे दिसतेय. (सविस्तर वाचा)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -