घरताज्या घडामोडीLIVE UPDATES : अखेर रिया चक्रवर्ती ईडी कार्यालयातून बाहेर आली

LIVE UPDATES : अखेर रिया चक्रवर्ती ईडी कार्यालयातून बाहेर आली

Subscribe
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्ये प्रकरणी ईडीमार्फत अभिनेत्री आणि सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिची ईडीकडून चौकशी केली जात असून आज, सोमवारी दुसऱ्यांदा तिला चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. दिवसभराच्या सव्वा दहा तासांच्या चौकशीनंतर रिया आता ईडी कार्यालयातून बाहेर पडली.
https://twitter.com/ANI/status/1292849735754223617

बिहारमधील आगामी निवडणुकांमुळेच सुशांतच्या आत्महत्येची इतकी चौकशी होत असल्याचे रिया चक्रवर्तीने म्हटले. आणखी दोन सेलिब्रिटींनी आत्महत्या केल्या. मात्र त्यांच्या केसची इतकी चर्चा का होत नाही. आशुतोष भाकर आणि समीर शर्मा यांनी नुकतेच आत्महत्या करून आपले जीवन संपवले. परंतू सुशांतच्या आत्महत्येची एवढी चौकशी का केली जात आहे. असे सवाल रियाकडून उपस्थित केले जात आहेत. आज, सोमवारी रिया चक्रवर्तीची ईडीच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जात असून गेल्या तासापासून रिया ईडी कार्यालयात उपस्थित आहे.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सीबीआयनं गुन्हा दाखल करण्याची किंवा या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची गरज नाही. तसेच हा तपास सीबीआयने मुंबई पोलिसांकडे वर्ग करावा अशी भूमिका राज्य सरकारच्यावतीनं सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट करण्यात आली आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात सुशांत सिंहचा भाऊ नीरज सिंह अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहे. सामनातील आरोपांवरुन भाजप आमदार नीरज सिंह मानहानीचा दावा ठोकणार आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची आज बैठक होणार आहे. महामंडळ वाटप, राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या अशा विविध विषयांवर चर्चा होणार आहे. मुख्यमंत्री ठाकरे समवेत अजित पवार, बाळासाहेब थोरात यांच्यासह महाविकास आघाडीतील प्रमुख नेते उपस्थित असण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

विद्यापीठाची अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करण्याबाबत याचिकांवर सुप्रीम कोर्टातली सुनावणी आता १४ ऑगस्ट रोजी होणार आहे. महाराष्ट्र, दिल्ली सरकारच्या प्रतिज्ञापत्रावर उत्तरासाठी यूजीसीने वेळ मागून घेतला.

- Advertisement -

ईडीकडून आज पुन्हा रिया चक्रवर्ती आणि सिद्धार्थ पिठाणीची चौकशी केली जाणार आहे. मॅनेजर श्रृती मोदी पण ईडी कार्यालयात पोहोचली.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -