घरताज्या घडामोडीLIVE UPDATES: ठाण्यात कोरोनाबाधितांची रुग्णालयातून उडी मारून आत्महत्या

LIVE UPDATES: ठाण्यात कोरोनाबाधितांची रुग्णालयातून उडी मारून आत्महत्या

Subscribe

कोरोना व्हायरससह इतर महत्वाच्या घडामोडी या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

सप्टेंबरच्या पहिल्या दिवसापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. रविवारी आतापर्यंतचे सर्वाधिक २३ हजार ३५० रुग्ण सापडले आहेत. पुण्यात सर्वाधिक २५३८ रुग्ण असून त्याखालोखाल मुंबई (१९१०), नागपूर(१५१८), कोल्हापूर (११७१)आणि नाशिक (११४६) यांचा समावेश आहे. राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ९,०७,२१२ झाली आहे. राज्यात २,३५,८५७ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात ३२८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या २६ हजार ६०४ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.९३ टक्के एवढा आहे. (सविस्तर वाचा)

- Advertisement -

बाळकूम येथील ठाणे महानगरपालिकेच्या कोविड ग्लोबल हॉस्पीटलच्या अति दक्षता विभागात उपचार घेत असलेले ७० वर्षीय कोविड रुग्णाने तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी घडली. भिका सखाराम वाघुले असे या रुग्णाचे नाव आहे. भिका वाघुले हे नगरसेवक संजय वाघुले यांचे चुलते होते. आजाराला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. ठाण्यातील मार्केट परिसरात राहणारे वाघुले हे कोरोना बाधित झाल्यामुळे त्यांना २१ ऑगस्ट रोजी ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्यामुळे त्यांना गेल्या काही दिवसांपासून याच श्वसनाचा त्रस जाणवू लागला होता. त्यामुळे त्यांच्यावर १ सप्टेंबरपासून अतिदक्षता विभागात उपचार सुरू होता. रविवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास अचानक तोंडाचे ऑक्सिजन काढून या विभागाच्या खिडकीतून स्वत:ला झोकून दिले. खाली कोसळल्यानंतर त्यांचा मृत्यु झाल्याची माहिती कोविड रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक अनिरुद्ध माळगावकर यांनी कापूरबावडी पोलिसांना दिली. पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली असून तपास सुरू आहे.


Rhea Chakraborty चौकशीनंतर NCB च्या कार्यालयातून बाहेर पडली असून आज रियाला अटक होणार नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे. एनसीबीकडून देखील त्यासंदर्भात स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे. दरम्यान, उद्या पुन्हा रियाची NCB कडून चौकशी होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

- Advertisement -


क्रिकेटप्रेमींना प्रतीक्षा असलेल्या IPL 2020 चं वेळापत्रक अखेर जाहीर करण्यात आलं आहे. यामध्ये पहिला सामना मुंबई इंडियन्स (MI) आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) यांच्यात अबुधाबी येथे होणार आहे. १९ सप्टेंबरला पहिला सामना होईल.

IPL 2020 Schedule

IPL 2020 Schedule


दुबईहून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या हस्तकाने याबाबतचा फोन आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे मातोश्री निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांचे वांद्र्यातील खासगी निवासस्थान असलेलं मातोश्री उडवून देऊ, अशी धमकी देण्यात आली आहे. दुबईवरुन मातोश्रीवर धमकीचे तीन ते चार फोन आले. त्या फोनवरुन मातोश्री उडवून देऊ, अशी धमकी देण्यात आली. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या हस्तकाने हे फोन केल्याचे समोर येतं आहे. (वाचा सविस्तर)


कोरोनाने आता मनोरंजन विश्वाला देखील विळखा घातल्याचे समोर येत आहे. मालिका आणि चित्रपटाच्या शुटिंगला परवानगी मिळाल्याने नियमाचे पालन करत मनोरंजन विश्वातील काम पुन्हा सुरू झाले आहे. असे असले तरी कलाकार मंडळींना कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे दिसतेय. अभिनेता अर्जुन कपूरला कोरोनाची लागण झाली आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट लिहित खुद्द अर्जुनने याबद्दलची माहिती दिली. (वाचा सविस्तर)


 


Unlock मुळेच संसर्ग वाढतोय – राजेश टोपे


देशभरासह राज्यात कोरोनाचा कहर सुरू असून दिवसेंदिवस कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. शनिवारी आलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात आतापर्यंत १६ हजार ९१२ कोरोनाची लागण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या आहे. तर कोरोना योद्धा म्हणून नागरिकांचे रक्षण करणारे महाराष्ट्र पोलीस देखील कोरोनाच्या विळख्यात सापडत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. गेल्या २४ तासांत ५११ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून सून त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तर ७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (वाचा सविस्तर)


एकनाथ खडसे, कटप्पा आणि शिवसेना!


रिया अटकेसाठी तयार, वकील मानेशिंदेंची माहिती


संजय राऊत म्हणतात, ‘कंगणाची माफी मागण्याचा विचार करेन, पण…’


देशात कोरोनाबाधितांचा आकडा ४१ लाखांपार!

भारतात कोरोनाबाधितांच्या आकड्यांनी ४१ लाखांचा टप्पा पार केला आहे. त्याचबरोबर रविवारी कोरोना संसर्ग झालेल्या रूग्णांची संख्या ही सर्वाधिक आहे. रविवारी ९० हजार ६३३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. परंतु दिलासादायक बाब म्हणजे कोरोना आजारातून बरे होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत ३१ लाख ८० हजारांहून अधिक लोक बरे झाले आहेत. (सविस्तर वाचा)


NCB आणि मुंबई पोलिसांची टीम पोहचली दाखल

अभिनेता सुशांत सिंहच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करता करता, ड्रग्जच्या मुद्द्यावरून रियाचा भाऊ एनसीबीच्या जाळ्यात अडकला. एनसीबीकडून रियाचा भाऊ शौविक आणि सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडाला शुक्रवारी अटक झाली. या दोघांना कोठडी सुद्धा सुनावण्यात आली आहे. दरम्यान अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ड्रग्ज कनेक्शनबाबत नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरो (एनसीबी) वेगाने हालचाली सुरु केल्या आहेत. दरम्यान, एनसीबी टीम मुंबई पोलिसांसह या प्रकरणातील कथित आरोपी अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या घरी पोहचली आहे. यावेळी एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी रियाला समन्स बजावलं आहे. (सविस्तर वाचा)


देशात आतापर्यंत ४ कोटी ८८ लाख ३१ हजारांहून अधिक कोरोना टेस्ट


जम्बो कोविड रुग्णालयातील २५ कर्मचाऱ्यांचा राजीनामा

पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यू झालेल्या पुण्यातील जम्बो कोविड रुग्णालय सुरू झाल्यापासून सातत्याने चर्चेत आहे. या ठिकाणी रूग्णांवर उपचार होत नसल्याचा आरोप सध्या करण्यात येत आहे. या रुग्णालयात रुग्णाची सेवा करण्यासाठी पुरेसे डॉक्टरही उपलब्ध नाहीत. अशा परिस्थितीत २५ कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिल्याने या रुग्णालयात पुढील अडचणी आणखी वाढल्या आहेत. (सविस्तर वाचा)


सत्ताधारी आणि विरोधकांचा चहा पानाचा कार्यक्रम रद्द. अधिवेशनाच्या आधी सरकारकडून चहा पानाचे आययोजन केले जाते. या चहापानला विरोधी पक्षाला देखील बोलवले जाते. पण हे चहापान यावर्षी रद्द झाले. राष्ट्रपती निधनामुळे दुखवटा आहे, त्यामुळेही चहापान रद्द. (सविस्तर वाचा)


राज्यात कोरोना रुग्णवाढीचा उच्चांक

या आठवड्यात महाराष्ट्रात रोज रुग्णसंख्येचा नवा नवा उच्चांक पाहायला मिळत आहे. सोमवारी पहिल्यांदा रुग्णसंख्या १६ हजारांच्या वर गेल्यानंतर आठवड्यातील प्रत्येक दिवशी हजाराने रुग्णसंख्या वाढलेली आहे. शनिवारी इतर राज्यात २०,४८९ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या ८,८३,८६२ झाली आहे. राज्यात २,२०,६६१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात ३१२ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या २६ हजार २७६ वर पोहोचली आहे. राज्यातील मृत्यूदर २.९७ टक्के एवढा आहे. राज्यात पहिल्यांदाच कोरोनाबाधितांचा एका दिवसाचा आकडा वीस हजारांच्या पुढे गेल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. (सविस्तर वाचा)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -