Coronavirus : पुढील ६ महिन्यात कोरोना विषाणूचा प्रभाव होणार कमी, आरोग्य तज्ज्ञांचे मत

coronavirus covid may become more manageable in 6 month
Coronavirus पुढील ६ महिन्यात कोरोना विषाणूचा प्रभाव होणार कमी, आरोग्य तज्ज्ञांचे मत

देशात कोरोनाबाधितांची संख्या गेल्या काही दिवसांपासून कमी होत आहे. तर कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रभाव दिवसेंदिवस कमी होत असून तो संपण्याचा दिशेने वाटचाल करीत आहे. असे मत आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. तर कोरोना विषाणूची रुग्णसंख्या पाहता पुढील सहा महिने महत्वाचे असणार आहेत. या सहा महिन्याच कोरोनाचा प्रभाव पूर्णपणे संपण्याच्या दिशेने प्रवास करणार आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले की, कोरोनाचे नवनव्या व्हेरियंटचा प्रभाव दिवसेंदिवस कमी होतोय. त्यामुळे कोरोनाचा एखादा व्हेरियंट तिसरी लाट आणू शकत नाही. असा दावा देखील त्यांनी केला.

कोरोनावरील सर्वाधिक अंदाज ठरले चुकीचे

कोरोना विषाणूवर काम करणारे नॅशनल सेंटर फॉर डिजीजचे डायरेक्टर डॉक्टर सुजित सिंग यांनी सांगितले की, कोरोना महामारीविषयी सर्वाधिक अंदाज फोल ठरले. मात्र पुढील सहा महिन्यात कोरोना विषाणू अंतिम टप्प्याच्या दिशेने जात आहे. कोरोना विषाणूचा प्रभाव अंतिम टप्प्यात पोहचला म्हणजेच प्रभाव पूर्णपणे कमी झाला असे नाही. मात्र कोरोना महामारीची स्थिती आरोग्य विभागाला व्यवस्थित हाताळता येऊ शकते. या विषाणूला चांगल्या आरोग्य सुविधांच्या आणि विविध उपचार पद्धतींच्या माध्यमातून रोखता येऊ शकते.

लसीकरण हेच प्रभावी शस्त्र

केरळमधील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येवर बोलताना डॉ. सुजित सिंग यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या कमी होतेय. त्यामुळे परिस्थितीवर नियंत्रण आलेय, मात्र कोरोना विषाणूविरुद्ध लढण्यासाठी लसीकरण हेच प्रभावी शस्त्र आहे. जागतिक आरोग्य संघटनेने यावर सांगितले की, कोरोना हा एक एंडेमिक आजार बनतोय. एंडेमिकचा अर्थ असा आजार जो ताप, सर्दी खोकल्याप्रमाणे येत असतो. मात्र पूर्णपणे संपत नाही.


Indian Railway : भारतीय रेल्वेच्या ‘या’ सेवा लवकरच होणार बंद, पण प्रवास होणार जलद