घरCORONA UPDATECoronavirus : धक्कादायक! ब्रिटनमध्ये पाळीव कुत्र्याला कोरोनाची लागण, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची माहिती

Coronavirus : धक्कादायक! ब्रिटनमध्ये पाळीव कुत्र्याला कोरोनाची लागण, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची माहिती

Subscribe

ब्रिटनमध्ये एका पाळीव कुत्र्याला कोरोना विषाणूची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ब्रिटनचे मुख्य पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. यापूर्वी देखील जगातील विविध देशांमध्ये इतर प्राण्यांमध्येही कोरोना विषाणूची लक्षणे आढळून आली आहेत. त्यामुळे माणसांप्रमाणे प्राण्यांनाही विषाणूची लागण होऊ लागल्याने चिंता व्यक्त केली जातेय.

मुख्य पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ३ नोव्हेंबर रोजी वेयब्रिज येथील प्राणी आणि वनस्पती आरोग्य एजन्सीच्या प्रयोगशाळेत झालेल्या चाचण्यांनंतर पाळीव कुत्र्यामध्ये कोरोना विषाणूची लक्षणे आढळून आली. मात्र कोरोनाबाधित कुत्रा आता घरी बरा झाला आहे.

- Advertisement -

कुत्र्याला संसर्ग होण्यापूर्वी मालकालाही झाली होती कोरोनाची लागण

पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, कुत्र्याला कोरोना होण्यापूर्वी त्याच्या मालकाला या विषाणूची लागण झाली होती. परंतु या प्राण्याला त्याच्या मालकाकडून किंवा इतर कोणत्याही पाळीव प्राण्याकडून कोरोना झाल्याचे कोणतेही पुरावे नाहीत.

मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी क्रिस्टीन मिडिलमिस यांनी निवेदनात म्हटले की, कुत्र्यांना संसर्ग होणे अत्यंत दुर्मिळ आहे, मात्र या प्राण्यांमध्ये कोरोनाची फक्त सौम्य लक्षणे दिसतात आणि ती काही दिवसांत बरी होतात.

- Advertisement -

पाळीव प्राणी थेट माणसामध्ये विषाणूचा प्रसार करतात याचे कोणतेही पुरावे नाहीत. मात्र या परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करू आणि जेव्हा परिस्थिती बदलेल तेव्हा पाळीव प्राण्यांच्या मालकांना अपडेट करु असंही मिडिलमिस म्हणाल्या.

याशिवाय वैद्यकीय अधिकारी कॅथरीन रसेल यांनी एका निवेदनात म्हटले की, आंतरराष्ट्रीय वचनबद्धतेनुसार या प्रकरणाची नोंद जागतिक प्राणी आरोग्य संघटनेला करण्यात आली आहे. युरोप, उत्तर अमेरिका आणि आशियातील इतर देशांमध्ये पाळीव प्राण्यांमध्ये कोरोना संसर्ग झाल्याची फारच कमी प्रकरणे नोंदवण्यात आली.

मात्र हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की, कुत्रे माणसांच्या आसपास राहतात. जर ते कोरोना विषाणूच्या संसर्गाचे मुख्य स्त्रोत बनू शकतात, तर कुत्र्यांच्या संपर्कात येणे धोकादायक होईल. तसेच आत्तापर्यंत विकसित झालेल्या कोरोनाविरोधी लस फक्त माणसांसाठीच आहेत. जगात प्राण्यांसाठी कोरोनावर कोणतीही लस नाही.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -