घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटCoronavirus: न्यूयॉर्कमध्ये भारतीय पत्रकाराचं कोरोनामुळे निधन

Coronavirus: न्यूयॉर्कमध्ये भारतीय पत्रकाराचं कोरोनामुळे निधन

Subscribe

अमेरिकेत कोरोनाने हाहाकार माजवला आहे. सध्या अमेरिकेत ४ लाख कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर १२ हजार ८५७ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये अनेक भारतीय वंशाच्या नागरिकांचाही समावेश आहे. त्यात आता भारतीय वंशाचे पत्रकार ब्रह्म कांचीबोटला यांचेही निधन झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील कांचीबोटला यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “भारतीय वंशाचे पत्रकार ब्रह्म कांचीबोटला यांच्या निधनाची माहिती मिळाल्यानंतर वेदना झाल्या. भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध सदृध होण्यासाठी त्यांनी नेहमी प्रयत्न केले होते. त्यांचे कुटुंब आणि मित्रपरिवाराप्रती मी सहवेदना अर्पण करतो. ओम शांती”

कांचीबोटला हे ९ दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. त्यांना २३ मार्च रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यांची तब्येत जास्त खालावल्यानंतर त्यांना लाँग आईसलँडच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. ३१ मार्च पासून ते व्हेटिंलेटरवर होते.

- Advertisement -

६६ वर्षीय कांचीबोटला यांनी १९९२ रोजी अमेरिकेत पत्रकारितेला सुरुवात केली होती. कांचीबोटला युनाटेड न्युज ऑफ इंडियाचे माजी प्रतिनिधी होते. त्याआधी त्यांनी भारतातील काही माध्यमांमध्ये नोकरी केली होती. कांचीबोटला यांच्या पश्चात त्यांची पत्नी अंजना, मुलगा सुदामा आणि मुलगी सौजना असा परिवार आहे. न्यूयॉर्कमध्ये सध्या कडकडीत लॉकडाऊन असल्यामुळे कांचीबोटला यांचे अंत्यसंस्कार कधी करायचे, याची कल्पना नसल्याची प्रतिक्रिया त्यांच्या मुलाने दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -