घरCORONA UPDATECoronavirus : CT स्कॅनमधूनही दिसतो कोरोना विषाणू, कशी कराल टेस्ट

Coronavirus : CT स्कॅनमधूनही दिसतो कोरोना विषाणू, कशी कराल टेस्ट

Subscribe

RT-PCR च्या चुकीच्या टेस्टमुळे देशात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत वाढत आहे. . कोरोनाची गंभीर लक्षणे असतानाही अनेक रुग्णाचे रिपोर्ट निगेटिव्ह येत आहेत. यात कोरोनाचा नवा स्ट्रेन RT-PCR चाचण्यांना चकवा देत आहे. यामुळे अनेक रुग्णांना दुसऱ्यांदा टेस्ट करण्याऐवजी CT स्कॅन करण्याचा सल्ला दिला जात आहे.

फुफ्फुसाचे एक्स-रे आणि HRCTs चाचणीच्या वाढत्या मागणीमुळे किंमतींमध्ये वाढ झाली आहे. मेडिकल डायग्नोस्टिक सेंटर आणि लॅब्स टेस्च सेंटरबाहेर रुग्णांची गर्दी वाढत आहे. कारण कोरोनाचा गंभीर परिणामांना समण्यासाठी CT स्कॅन मदतपूर्ण ठरत आहे. परंतु ही टेस्ट किंवा CT स्कॅन कोणासाठी गरजेची आहे? या CT स्कॅन रिपोर्ट कसा वाचता येतो? याची माहिती यातून जाणून घेऊ या…

- Advertisement -

HRCTs रिपोर्ट असतो कसा?

हाय रेजोल्यूशन कॉम्प्यूटर्ड टोमोग्राफी (एचआरसीटी) टेस्ट शरीरात कोरोना विषाणूचे इंफेक्शन आहे की नाही याची माहिती जाणून घेण्याची वेगळी पद्धत आहे. दरम्यान HRCTs ही चाचणी त्याच रुग्णांनी करावी ज्यांचात कोरोनाची लक्षणे दिसत आहेत मात्र कोरोनाचा RT-PCR रिपोर्ट निगेटिव्ह येत आहे.

रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी ज्याप्रकारे रॅट (रॅपीड एंटीजन टेस्ट) आणि आरटी-पीसीआर (रियल टाइम पॉलीमिरेझ चेन रिएक्शन टेस्ट) या टेस्ट नाकावाटे गळ्यातील स्वॅब घेत केल्या जातात. त्याचप्रकारे HRCTs ही चाचणी डायग्नोस्टिक टूलपैकी एक आहे ज्यात फुफ्फुसात असलेल्या विषाणूची माहिती घेतली जाऊ शकते.

- Advertisement -

कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन सुरुवातीच्या काही दिवसात रुग्णाचा फुफ्फुसाला गंभीर परिणाम करत आहेत. यामुळे CT स्कॅन करून रुग्णाच्या फुफ्फुसातील कोरोनाचे इंफेक्शन किती प्रमाणात आहे हे जाणून रुग्णावर तात्काळ उपचार करता येत आहेत.

HRCTs (एचआरसीसीटीएस )अहवाल

– सामान्यत: HRCTs टेस्टची रीडिंग CORAD स्कोर आणि CT स्कोरच्या आधारावर केली जाते. जी RT-PCR टेस्टमध्ये डिटेक्ट केलेल्या CT वॅल्यूपेक्षा अगदी वेगळी असते. CORAD ची स्कोरिंग १ ते ६ अंकांचामध्ये केली जाते. यातील १ अंकाचा अर्थ फुफ्फुसाला कोरोनाचे कोणतेही इंफेक्शन झालेले नाही. तर २ ते ५ मधील अंक इंफेक्शन असल्याचे दर्शवतात. तर ५ अंकाचा अर्थ कोरोनाची सामान्य लक्षणे आहेत. यात ६ अंकाचा अर्थ कोरोनाचा सर्वाधिक धोका असल्याचे दर्शवतात. दरम्यान RT-PCR टेस्टनंतरचे पॉझिटिव्ह रिपोर्ट आणि श्वास घेण्यास त्रास होत असलेल्या लक्षणांचा आधारेही रुग्णांना CORAD-६ स्कोर दिला जात आहे.

CORAD शिवाय, HRCTs स्कॅनमध्येही कधी-कधी CT सीव्हेरिटी स्कोर दिला जातो. ज्यामुळे आम्ही फुफ्फुसाचा सध्याच्या स्थितीबद्ल माहिती दर्शवतो. प्रत्येक लॅबमध्ये याचे वेगवेगळ्या पद्धतीने रीड केले जाते. सर्वाधिक लॅब्समध्ये ते १ते ४० किंवा १ ते २५ दरम्यानचे अंक दर्शविले जातात. स्केलवरील सर्वात मोठा आकडा फुफ्फुसाला कोरोनाचा गंभीर परिणाम झाल्याचे आणि धोका अधिक असल्याचे दर्शवतात.

दरम्यान HRCTs टेस्टमध्ये हायस्कोर दर्शवण्यात आले असले तरी प्रत्येक रुग्णाला रुग्णालयात भर्ती करणे गरजेचे नसते. कारण कोरोनाची सामान्य लक्षणे असलेल्या रुग्णांनाही फुफ्फुसांना कोरोनाचे इंफेक्शन होते. असे रुग्ण योग्य उपचारांनंतर घरातच कोरोनामुक्त होऊ शकतात.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -