CoronaVirus: काश्मीरमध्ये करोनाचा पहिला बळी!

coronavirus death in jammu kashmir 65 year old man dies in srinagar
CoronaVirus: काश्मीरमध्ये करोनाचा पहिला बळी

काश्मीरमध्ये पहिला करोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाल्याची धक्कादायकबाब समोर आली आहे. काश्मीरमधील श्रीनगर येथील हैदरपुरा भागातील ६५ वर्षीय व्यक्तीचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. या मृत व्यक्तीला मधुमेह, उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याचं समोर आलं आहे.

माहितीनुसार, या करोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे. त्याला या अगोदर लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाबाचा आजारा होता. हा रुग्ण श्रीनगरातील हैदरपोरा येथील रहिवाशी असल्याचं सांगितलं जातं आहे. हा करोनाचा रुग्ण नवी दिल्ली, उत्तर प्रदेशहून परतला होता. तो इंडोनेशिया आणि मलेशियामध्ये ‘तबलीही जमात’मध्ये भाग घेत होता.

आतापर्यंत काश्मीर खोऱ्यामध्ये आठ जणांनी करोना चाचणी केली आहे. तर संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये करोनाग्रस्तांची रुग्णांची संख्या ११वर पोहोचली आहे. या महिन्याच्या सुरुवातील जम्मू-काश्मीरमध्ये तीन रुग्ण आढळले होते. काश्मीर मधील करोनामुळे पहिला मृत्यू झालेल्या संदर्भात श्रीनगरचे महापौर जुनैद अजीम मट्टू यांनी ट्विट केलं आहे.

देशातील करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. आतापर्यंत १३ बळी गेले आहे. तर ६६५ जणांना करोनाची लागण झाली असल्याचं समोर येत आहे. करोनाचे सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले आहेत.


हेही वाचा – CoronaVirus: करोनाचा हाहाःकार; ही आहे जगभरातील सद्यस्थिती!