घरCORONA UPDATECoronavirus: 'या' प्राण्यामुळे जन्माला येणार कोरोनाचा नवा व्हेरिएंट; शास्त्रज्ञांचा दावा

Coronavirus: ‘या’ प्राण्यामुळे जन्माला येणार कोरोनाचा नवा व्हेरिएंट; शास्त्रज्ञांचा दावा

Subscribe

जगभरात कोरोनाच्या ओमिक्रॉन विषाणूने थैमान घातले आहे. अनेक देशांमध्ये आता या व्हेरिएंटचे नवे रुग्ण आढळून येत आहे. अशातच हरीण या प्राण्यामुळे जगात पुन्हा एकदा कोरोनाचा नवा व्हेरिएंट जन्माला येईल असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. दरम्यान पांढऱ्या शेपटीच्या जंगली हरणांमध्ये कोरोनाचे नवे तीन व्हेरिएंट आढळून आले आहेत. यासंदर्भात अमेरिकेच्या ओहियो युनिव्हर्सिटीमध्ये एक अभ्यास करण्यात आला. ज्यामध्ये असे आढळले की, कोणताही प्राणी व्हेरिएंटसाठी जलशय म्हणून काम करू शकतात. यातून अनेक धोकादायक आणि घातक व्हेरिएंट समोर येऊ शकतात.

जगभरात सापडणाऱ्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे चिंतेत दिवसेंदिवस भर पडतेय. अशातच वेगाने पसरणाऱ्या ओमिक्रॉन व्हेरिएंटची माहिती समोर आली. ओहयो स्टेट युनिव्हर्सिटीच्य़ा स्टडीचे वरिष्ठ लेखक प्रोफेसर एंड्रयू बोमन म्हणाले की, अन्य स्टडीच्या पुराव्यांचा आधार घेत आम्ही म्हणतोय की, जंगलातील हरीण कोरोना व्हेरिएंटचे थेट शिकार होऊ शकतात. लॅबमध्ये आपण हरणांना कोरोना संक्रमित करु शकतो. त्यानंतर हे संक्रमित हरीण इतर असंक्रमित हरणांमध्ये संक्रमण वेगाने पसरवू शकतात.

- Advertisement -

याशिवाय जर हरीण जंगलात असतानाही कोरोना संक्रमित होत असतील तर मानवांनामध्येही ते कोरोनाचा नवा व्हेरिएंट पसरवू शकतात. जवळपास ३६० प्राण्यांच्या नमुन्यांपैकी एक तृतीयांश नमुन्यांमध्ये हरणांमध्ये आढळलेले तीन व्हेरिएंट आढळून आले आहेत. वेगवेगळ्या सहा ठिकाणांहून या व्हेरिएंटचा शोध लागला आहे.

हरणांमध्ये कोरोनाचे व्हेरिएंट वेगाने पसरत असल्याचे पुरावे आहेत. ज्यामुळे व्हेरिएंटचे एक धोकादायक रुप समोर येऊ शकते. जानेवारी ते मार्च २०२१ दरम्यान हरणांचे नमुने घेण्यात आले होते. मात्र त्यावेळी डेल्टा किंवा इतर कोणत्याही व्हेरिएंटची माहिती समोर आलेली नाही. मात्र आता जीनोम सिक्वेन्सिंगमधून आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे

- Advertisement -

हरणांमध्ये आढळणारे व्हेरिएंट स्थानिक कोविड रूग्णांमध्ये आढळणाऱ्या व्हेरिएंटप्रमाणेच होते. त्यामुळे व्हेरिएंटची उपस्थिती सूचित करते की, हा व्हेरिएंट जंगली हरणांमध्ये अस्तित्वात असू शकतो. हरणाला संसर्ग कसा झाला किंवा प्राण्यांच्या शरीरात हा विषाणू कसा वागतो हे अद्याप कळू शकलेले नाही.

या परिणामांच्या आधारे संशोधकांचे म्हणणे आहे की, संसर्गाचा प्रसार १३.५ ते ७० टक्क्यांपर्यंत आहे. यावर प्रोफेसर बोमन म्हणाले की, हरणांमध्ये कोरोना विषाणूचे म्यूटेट झाल्यास एक नवीन व्हेरिएंट मानवांसह इतर प्राण्यांपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे हरणामुळे नवा व्हेरिएंट तयार झाल्यास तो मानवाच्या अडचणीत आणखी भर घालू शकतो.


Omicron Variant : अमेरिकेत ओमिक्रॉनचा कहर; न्यूयॉर्कमध्ये सर्वाधिक लहान मुलं रुग्णालयात दाखल

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -