घरCORONA UPDATEपिझ्झा डिलिव्हरी बॉयच्या संपर्कात आलेले १६ जण निगेटिव्ह

पिझ्झा डिलिव्हरी बॉयच्या संपर्कात आलेले १६ जण निगेटिव्ह

Subscribe

दिल्लीत पिझ्झा डिलिव्हरीचे काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याच्या संपर्कात येणाऱ्या १६ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

दिल्लीत पिझ्झा डिलिव्हरीचे काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर प्रशासनाने त्याच्या संपर्कात आलेल्या ७२ जणांना क्वॉरंटाईन केले. त्यातील १६ जणांचे अहवाल आले असून त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे दिल्लीकरांना थोडासा दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

दक्षिण दिल्लीतील मालवीय नगरमध्ये एका पिझ्झा डिलिव्हरी बॉयला कोरोनाची बाधा झाली होती. कोरोनाची बाधा झाल्यानंतरही या पिझ्झा डिलिव्हरी बॉयने दक्षिण दिल्लीमधील अनेक विभागात पिझ्झा डिलिव्हरी केला होता. त्यामुळे या भागातील ७२ कुटुंबियांना क्वॉरंटाइन करण्यात आले होते. त्यानंतर १६ डिलिव्हरी बॉयच्या संपर्कात आलेल्या लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे लोकांची चिंता दूर झाली आहे.

देशात १७ हजार २६५ कोरोनाबाधित

देशात कोरोनाबाधितांचा आकडा वाढला असून आतापर्यंत १७ हजार २६५ जण कोरोनाबाधित असून यामध्ये ५४३ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर २ हजार ५४७ रुग्ण कोरोनापासून बरे झाले आहेत. तर गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे १ हजार ५५३ नवे रुग्ण आढळले असून ३६ जणांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – करोना सर्वेक्षणात हलगर्जीपणा नको!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -