घरट्रेंडिंगEMI वाचवायचं आमिष दाखवून होऊ शकते तुमची फसवणूक!

EMI वाचवायचं आमिष दाखवून होऊ शकते तुमची फसवणूक!

Subscribe

कोरोना व्हायरसच्या काळात सगळे व्यवहार बंद झाले असताना बँकेने ३ महिन्यांचा ईएमआय सवलत दिली आहे. त्याचबरोबर बँकेने ग्राहकांना अन्य सुविधाही दिल्या आहे. मात्र बँकेने दिलेल्या  सुविधांचा फायदा जर कोणत्या ग्राहकांना घेता येत नसेल तर त्या ग्राहकांसाठी बँकेने काही सुचना दिल्या आहेत. बँकेने ग्राहकांना फसव्या लोकांपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. बँकेने ग्राहकांना सांगितले आहे की, ओटीपी, पासवर्ड सारख्या गोष्टी अनोळखी व्यक्तीला सांगू नका. एक्सिस बँक, भारतीय स्टेट बँक, सारख्या अनेक बँकांनी गेल्या काही दिवसांपासून आपल्या ग्राहकांना मेसेज पाठवून सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. बँकांनी ग्रहकांना मेसेज आणि इमेल पाठवून सतर्कतेचा इशारा दिला आहे. यावेळी बँकेने फसव्या मेलपासूनही सावध राहण्यास ग्राहकांना सांगितलं आहे.

ग्राहकांना पाठवला मेल

एक्सिस बँकेने ग्राहकांना मेल पाठवून सतर्क केलं आहे. या इमेल मध्ये म्हटलं आहे की, या फसव्या लोकांनी बँकेची माहिती जाणून घेण्यासाठी नवीन पध्दत सुरू केली आहे. हे फसवे लोक तुम्हाला ईएमआयच्या संदर्भात प्रश्न विचारून ओटीपी, पासवर्ड, भँकेने दिलेला पीन यांची मागणी करतात. त्यांच्यापासून सावध रहा. ते तुम्हाला फसवू शकतात.

- Advertisement -

एसबीआयने ट्वीट करत दिली माहिती

भारतीय स्टेट बँकने पाच एप्रिलला ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, सायबर गुन्हे कसे वाढत आहेत. ग्रहाकांना कसा चुना लावला जातोय. ग्राहकांनी कसं सतर्क रहायला हवं हे ट्वीटमध्ये सांगितलं आहे. ग्राहकांना फोन येतो आणि फोनवर ईएमआयसाठी फोन केला आहे असं सांगून ओटीपी विचारला जातो आणि खात्यातून पैसे काढले जातात. त्यामुळे ग्राहकांनी सतर्क रहा असा सल्ला बँकेने दिला आहे.

कोरोनामुळे देशातील नागरिकांचं अगणित आर्थिक नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत आरबीआयकडून सामान्यांना दिलासा देणाऱ्या अनेक योजना राबण्यात येत आहेत. आरबीआयने ईएमआय वर 3 महिन्यांची सवलत दिली आहे. पण जर तुमच्या बँक खात्यातून ईएमआय वजा झाला असेल तर घाबरू नका कारण तुमच्यासाठी एक खूषखबर आहे. कारण बँक खात्यातून कापलेला इएमआयची रक्कम बँक परत करणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रिझर्व बँकेने सगळ्या बँकांना तशा सुचना दिल्या आहेत.

- Advertisement -

हे ही वाचा – खुशखबर! बँकेतून कापला गेलेला ईएमआय परत मिळणार!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -