घरदेश-विदेशCoronaVirus जुनाच! 21 वर्षांपूर्वीही होता अस्तित्वात; संशोधकांचा दावा

CoronaVirus जुनाच! 21 वर्षांपूर्वीही होता अस्तित्वात; संशोधकांचा दावा

Subscribe

गेल्या दीड वर्षांपासून जगात कोरोनाचा कहर सुरू असून अद्याप या कोरोनावर जगभरातील संशोधक संशोधन करत आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठातही कोरोनाच्या इतिहासावर संशोधन सुरु झाले आहे. या संशोधनादरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. कोरोना हा काही दशक किंवा शतके जुना नसून २१ हजार वर्षांपूर्वीही त्याचे अस्तिस्व होते, असे ऑक्सफोर्डच्या संशोधकांनी दावा केला आहे. या दाव्यानुसार, माणसाच्या शरीरात गेल्या दोन दशकात सार्सच्या या व्हायरसने प्रवेश केला असून २००२ ते २००४ दरम्यान, जगभर सार्सचा रोग पसरला होता. त्यावेळी झालेल्या संसर्गाला SARS-Cov-2 हा विषाणू जबाबदार होता.

ऑक्सफोर्ड विद्यापीठात सुरू असलेल्या कोरोनाच्या संशोधनावरून असे समोर आले की, कोरोना व्हायरसने तब्बल २१ वर्षांपूर्वी पहिल्यांदा आपले अस्तित्त्व दाखवले होते. काही शतकांपूर्वी कोरोना व्हायरसचे मुळ अस्तित्त्वात आला असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. याच आधारावर हे संशोधन विद्यापीठात सुरू करण्यात आले. हे संशोधन करताना जो अपेक्षित कालावधी संशोधकानी गृहित धरला होता मात्र त्यापेक्षा एक-दोन नाही तर तीस पट मागे या कोरोनाचं अस्तित्त्व आढळलं.

- Advertisement -

दरम्यान, ऑक्सफोर्ड विद्यापीठात सुरू असलेल्या संशोधनाच्या टीमचे प्रमुख प्रो. कात्झोरॅकिस यांनी असे म्हटले की, कोरोनाचं मूळ शोधल्यानंतर हा व्हायरस माणसाच्या शरीरात किती काळापर्यंत वास्तव्य करू शकतो, त्याची तीव्रता किती असू शकते किंवा भविष्यात यापासून आणखी किती धोका आहे, अशा अनेक गोष्टींवर या संशोधनातून प्रकाश पडू शकतो. कोरोनाचे मूळ शोधून काढण्यासाठी एका पद्धतीचा शोध घेण्यात आला आहे. त्यावरून असे लक्षात आले की, आताच्या कोरोनाचे मूळ हे २१ हजार वर्षांपूर्वीही अस्तित्वात होते. या संशोधनामुळे माणसाच्या RNA आणि DNA मध्ये भूतकाळात काय बदल झालेत याचाही अभ्यास करता आल्याचे संशोधनाचा एक भाग असल्याचे महॅन गॅफरी यांनी सांगितले.


 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -