घरताज्या घडामोडीमास्कमुळे रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास होतेय मदत, तज्ज्ञांचा दावा

मास्कमुळे रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास होतेय मदत, तज्ज्ञांचा दावा

Subscribe

जगभरात कोरोना विषाणूचा फैलाव सातत्याने वाढताना दिसत आहे. त्यामुळे कोरोना विषाणूला रोखण्यासाठी सुरुवातीपासून वेगवेगळ्या स्तरावर उपाय योजना केल्या जात आहे. तसेच सुरुवातीपासून मास्क घालण्याचे आवाहन देखील दिले जात आहे. दरम्यान आरोग्य तज्ज्ञांनी मास्क घालण्याचा नवा आणि मोठा फायदा सांगितला आहे. एका रिपोर्टमध्ये दावा केला आहे की, ‘मास्क हा फक्त कोरोना पसरवण्याचा वेग कमी करत नसून तो रोग प्रतिकारशक्ती (Immunity system) वाढवण्यासाठी देखील मदत करतो.’

मास्क घातल्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढण्याचा दावा करणारा रिपोर्ट ‘न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिकल’मध्ये प्रकाशित झाला आहे. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाचे जॉर्ज डब्ल्यू रदरफोर्ड आणि मोनिका गांधी म्हणाल्या की, ‘मास्क शरीरातील रोग प्रतिकारकशक्तीस चालना देण्यासाठी ‘व्हेरिओलेशन’ म्हणून काम करू शकतो. तसेच संसर्गाची गती कमी देखील करतो.’

- Advertisement -

तज्ज्ञांनी दावा केला आहे की, ‘फेस मास्क थेंबासह बाहेर येणाऱ्या संसर्गजन्य घटकांना फिल्टर करू शकतो. तसेच शिंकल्यावर आणि खोकल्यावर खूप कमी प्रमाणात व्हायरस मास्कमधून बाहेर पडू शकतात.’ त्यांनी पुढे सांगितले की, ‘कोरोना वॅक्सीन येईपर्यंत लोकं मास्कचा वापर करू शकतात. सध्या मास्कमुळे कोरोनाचे संक्रमण कमी प्रमाणात होत असल्याचे देखील समोर येत आहे. यामुळे लोक फार आजारी पडत नाही आहेत आणि त्यांचे लसीकरण देखील होत आहे.’


हेही वाचा – Corona Vaccine: गूडन्युज! देशात पुढच्या वर्षी येणार कोरोना वॅक्सीन

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -