घरताज्या घडामोडीलग्न सोहळा पडला महागात! १३५ जण कोरोनाबाधित, संपूर्ण गाव केलं सील

लग्न सोहळा पडला महागात! १३५ जण कोरोनाबाधित, संपूर्ण गाव केलं सील

Subscribe

देशभरात कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे अनेक राज्यांनी मोठ मोठ्या सोहळ्यांवर बंदी घातली असून काही निर्बंध लावले आहेत. त्यापैकी एक सोहळा म्हणजे लग्न सोहळा. प्रत्येकांची इच्छा असते आपलं लग्न थाटामाटात पार पडावं. पण सध्या कोरोनाचा काळ असल्यामुळे लग्न सोहळ्यावर निर्बंध लावण्यात आले आहेत. अनेक लग्न सोहळ्यांमुळे कित्येक जण कोरोनाचा शिकार झाले आहेत. असाच काहीसा प्रकार छत्तीसगढमध्ये घडला आहे. छत्तीसगढमध्ये जांजगीर चांपा जिल्ह्यातील सक्तीगुडी गावातील लग्न सोहळ्यात कोरोना विस्फोट झाला आहे. पाचशे लोकसंख्या असलेल्या या गावात आतापर्यंत १३५ जण कोरोनाबाधित झाले आहेत. प्रत्येक घरात एक किंवा दोन जण कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे आता ग्रामपंचायतने संपूर्ण गाव सील केलं आहे. तसेच गावात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी बाहेरून येणाऱ्या लोकांवर बंदी घातली आहे.

जांजगीर-चांपा जिल्ह्यातील ग्रामपंचायत नवागावचे सक्तीगुडी गावामध्ये १ ते ५ एप्रिल दरम्यान कंवर कुटुंबातील लग्न होते. वर-वधू दोघंही या एकाच गावातले होते. यामुळे गावातील बहुतेक लोकं या लग्न सोहळ्याला उपस्थित होते. लग्न सोहळ्यानंतर ७ एप्रिलला गावात पहिला रुग्ण आढळला. यानंतर हळूहळू एक-एक रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली.

- Advertisement -

त्यानंतर सरपंच रीना कंवर यांनी गावात कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेताला. तीन दिवस एक कँप लावून गावकऱ्यांची चाचणी केली. यादरम्यान १३५ गावकरी कोरोना पॉझिटिव्ह आढळले. सक्तीगुडीतील सर्व बाधितांचा आता होम आयसोलेशनमध्ये राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यांना औषधासह इतर आवश्यक सामनांचे वितरण प्रशासन करत आहे. तर डॉक्टर पण मोबाईल आणि Whatsappच्या माध्यमातून बाधितांना संक्रमित असल्याची माहिती देत आहे.

जांजगीर चांपाचे जिल्हाधिकारी यशवंत कुमार यांनी सांगितले की, पंचायतने गावातील प्रवेशद्वारावर बेरिकेड्स लावले आहेत. औषध आरोग्य विभागाकडून उपलब्ध करून दिली जात आहेत. मी घटनास्थळी पोहोचून सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा सूचना दिल्या आहेत.

- Advertisement -

दरम्यान Active रुग्णसंख्येत महाराष्ट्रानंतर छत्तीगढचा दुसऱ्या क्रमांकावर आहे. १४ एप्रिलला महाराष्ट्रात १३ हजार ६३५ Active रुग्ण होते. तर छत्तीसगढमध्ये हाच आकडा १८ हजार ६३६ इतका होता.


हेही वाचा – Maharashtra Corona Update: राज्यात कोरोनाचा कहर कायम! पुन्हा ६० हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -