घरट्रेंडिंगCorona Live Updates : रत्नागिरीत आढळला करोनाचा रुग्ण!

Corona Live Updates : रत्नागिरीत आढळला करोनाचा रुग्ण!

Subscribe

रत्नागिरीमध्ये पहिला करोना व्हायरसचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. रत्नागिरीतील ५० वर्षांच्या व्यक्तीला करोनाची लागण झाली आहे.


पिंपरी चिंचवडमध्ये अजून करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. २१ वर्षांचा हा करोना बाधित रुग्ण आहे. त्याने फिलीपिन्स, सिंगापूर आणि कोलंबो या ठिकाणाहून त्याने प्रवास केला आहे.

- Advertisement -

करोनाग्रस्तांच्या संपर्कात आल्यामुळे मुंबईत एक करोनाग्रस्त माहिला आढळली आहे.

सविस्तर बातमी वाचा –

- Advertisement -

Coronavirus: मुंबईत आढळला करोनाचा नवा रुग्ण


हिगोंलीत अजून एक संशयित रुग्ण आढळल्याचं समोर आलं आहे.


आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लवकरच हाफकिनमध्ये दोन लॅब सुरू होणार असल्याच पत्रकार परिषदमध्ये सांगितलं.


राज्यात करोनाची संख्या ४२वर 

पिंपरी-चिंचवड १०
पुणे ८
मुंबई ७
नागपूर ४
कल्याण ३
नवी मुंबई ३
यवतमाळ ३
ठाणे १
रायगड १
अहमनगर १
औरंगाबाद १


उद्यापासून राज्यात तीन ठिकाणी करोना चाचणी करण्यासाठी लॅब सुरू होणार आहेत. तसंच लवकरच अजून आठ ठिकाणी लॅब सुरू करण्याच्या निर्णय घेतला असल्याच आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.


जगभरातील करोनाग्रस्तांची संख्या २ लाखांवर गेली आहे. त्यापैकी ७ हजार ९८९ जणांचा मृत्यू झाला आहेत. तर या आजारातून ८२ हजार ०३७ लोक रिकव्हर झाले आहेत.

ncov2019.live  या वेबसाईटवर तुम्हाला करोनाची खात्रीलायक आकडेवारी मिळते. 


सौदी अरेबियामधून परतलेले माजी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेभ प्रभू यांनी स्वतःलाच सेल्फ क्वॉरन्टाइन करुन घेतले आहे. पुढचे १४ दिवस ते स्वतःहूनच वेगळे राहणार आहेत. सुरेश प्रभू हे १० मार्च रोजी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर गेले होते. तिथे शेरपाज या बैठकीला त्यांनी सहभाग नोंदविला होता. भारतात परतल्यानंतर त्यांची टेस्ट निगेटिव्ह आली होती. मात्र तरिही खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी स्वतःला १४ दिवससांठी अलग करण्याचा निर्णय घेतला आहे.

 


 

करोना व्हायरसमुळे जगभरातील १३७ देशांना चिंताग्रस्त केले आहे. मात्र भारताने मोठ्या धैर्याने करोनाचा सामना केला आहे. त्यातही महाराष्ट्रात रुग्णांचा आकडा सर्वात जास्त म्हणजेच ४२ आहे. महाराष्ट्रात आज या संख्येत आणखी एका रूग्णाची भर पडली आहे. तरीही महाराष्ट्र सरकारने ज्यापद्धतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना आखल्या आहेत. त्याचेही कौतुक होत आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -