CoronaVirus: सरकारचा मोठा निर्णय; व्हेंटिलेटर्स, मास्क, PPE वरील सर्व कर रद्द

३० सप्टेंबर २०२० पर्यंत काही विशेष मेडिकल वस्तूंवर कोणताही कर आकारला जाणार नाही

Nirmala Sitharaman hands over keys to 650 home buyers in Mumbai through Khidki Yojana
अर्थमंत्री निर्मला सीतारमण

कोरोना व्हायरसविरोधातील लढाईवर मात करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने मोठा निर्णय जाहीर केला आहे. हा निर्णय जाहीर करताना व्हेंटिलेटर्स, मास्क, PPE सारख्या मेडिकल वस्तू स्वस्त व्हाव्यात यासाठी या वस्तूंवरील सर्व कर रद्द करण्यात आले आहे. केंद्र सरकारने या मेडिकल साधनांवरील कस्टम ड्यूटी आणि हेल्थ सेस देखील रद्द केले आहे. ३० सप्टेंबर २०२० पर्यंत काही विशेष मेडिकल वस्तूंवर कोणताही कर आकारला जाणार नाही, असे सरकारने सांगितले आहे.


CoronaVirus – ‘हा’ उद्योगपती वर्षभर घेणार केवळ १ रूपया पगार!

वित्त मंत्रालयातर्फे यासंदर्भातील एक प्रसिद्ध पत्रक देखील जारी करण्यात आले आहे. या प्रसिद्धी पत्रकानुसार, कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे व्हेंटिलेटर आणि इतर आवश्यक असणाऱ्या वस्तूंची गरज असल्याने सरकारने सध्या यासर्व वस्तूंवरील सर्व प्रकारचे कर रद्द केले आहेत. तुर्तास व्हेंटिलेटर्स, फेसमास्क, सर्जिकल मास्क, पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट, Covid-19 टेस्ट किट्स यावरील कर प्राधान्याने हटवण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य-केंद्रशासित प्रदेशांना निधी देण्यास मान्यता

यापूर्वी सरकारने १५ हजार कोटी रूपये Covid-19 अत्यावश्यक निधीसाठी मंजूरी दिली होती. या निधीचे नाव इंडिया Covid-19 इमर्जन्सी रेसपॉन्स अँड हेल्थ सिस्टम प्रीपेयर्डनेस असे देण्यात आले आहे. तसेच कोरोना व्हायरसविरोधात लढण्यासाठी केंद्र सरकारने या निधी अंतर्गत १५ हजार कोटी रूपये दिले आहेत. केंद्र सरकारने राज्य आरोग्य यंत्रणेच्या दुरूस्तीच्या उद्देशाने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना संपूर्ण निधी देण्यास मान्यता दिली आहे. यासाठी केंद्र सरकारने इंडिया Covid-19 इमर्जन्सी रिस्पॉन्स हेल्थ सिस्टम (India COVID-19 Emergency Response and Health System Preparedness Package) पॅकेज जाहीर केले आहे.