घरCORONA UPDATE'करोना' चिनी शस्त्र; अमेरिकेचा आरोप, दोन्ही देशांमध्ये वाढला तणाव

‘करोना’ चिनी शस्त्र; अमेरिकेचा आरोप, दोन्ही देशांमध्ये वाढला तणाव

Subscribe

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी करोना चिनी विषाणू असल्याचा आरोप केला आहे. हा आरोप त्यांनी मागे घ्यावा अशी मागणी चीन करत आहे, मात्र, अमेरिका या आरोपावर अद्याप ठाम आहे. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे.

एका बाजूला अमेरिकेसह युरोपियन देशांना करोना विषाणूचा विळखा अधिक घट्ट होत असताना दुसरीकडे चीनमधील वुहान आणि हुबई या शहरांमधील परिस्थिती पूर्वपदावर येत असून ‘आम्ही करोना वर यशस्वी मात केली आहे, आम्ही अमेरिकेसह सर्व युरोपियन देशांना या विषाणूचा संसर्ग थांबवण्यासाठी सर्व वैद्यकीय मदत करू इच्छित आहे’, असे चीनने म्हटले आहे. मात्र, अमेरिका चीनची मदत धुडकावून लावत आहे. सध्या दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी करोना चिनी विषाणू असल्याचा आरोप केला आहे. हा आरोप त्यांनी मागे घ्यावा अशी मागणी चीन करत आहे, मात्र, अमेरिका या आरोपावर अद्याप ठाम आहे.

चिनी जैविक शस्त्र आहे की अमेरिकन?

सध्या चीनमधील ज्या शहरांमध्ये करोनाचा सर्वात जास्त संसर्ग झाला ते हुबई आणि वुहान ही दोन्ही शहरे पूर्वपदावर येत असल्याचा दावा चीनने केला असतानाच चीनवर आता आंतरराष्ट्रीय पातळीवरून आरोप होऊ लागले आहेत. सध्याच्या परिस्थितीत जगातील १६८ देशांमध्ये या विषाणूचा संसर्ग सुरू आहे, यावर कोणतेही औषध विकसित झाले नसतानाही अचानक चीनमधील वुहान आणि हुबई ही शहरे पूर्वपदावर कशी आली? अमेरिकेसह सर्व युरोपियन देश तसेच भारतातही बहुतांश राज्यांमध्ये याचा संसर्ग झालेला असतानाही चीनमध्ये मात्र दोन शहरे वगळता कोणत्याही शहरांमध्ये याचा संसर्ग का झाला नाही? बीजिंगमध्ये एकही करोनाचा रुग्ण का आढळून आला नाही? असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. ज्या काळात चीनने करोना विषाणू बाबत जगाला सांगितले तेव्हा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने हा विषाणू अमेरिकेने चीनमध्ये सोडल्याचा आरोप केला होता, तोपर्यंत या विषाणूने अमेरिकेत प्रवेश करून तेथील हजारो नागरिकांना याचा संसर्ग झाला होता. त्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा चिनी विषाणू असल्याचे म्हटले आहे. यामुळे नाराज चीनने यावर अमेरिकेने माफी मागण्याचा आग्रह धरला आहे. मात्र, अमेरिका या आरोपावर ठाम आहे. एका बाजूला या विषाणूने अमेरिकेसह युरोपियन देशांच्या नाकीनऊ आणली असताना दुसरीकडे हे चिनी जैविक शस्त्र आहे की अमेरिकन आहे? या वरून अमेरिका आणि चीन यांच्यात टोकाचे वाद सुरू झाले आहेत. आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.

- Advertisement -

दरम्यान, चीन सरकार आता जगाला या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व वैद्यकीय मदत करण्यास तयार असल्याचे म्हणत आहे. गुरुवारी बीजिंग येथे चीनचे राष्ट्राध्यक्ष झीनपिंग हे जी २० देशाना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे करोना वर संबोधित करणार आहेत. तसेच अमेरिकेलाही यासाठी मदत करण्याची तयारी असल्याचे म्हणत आहे. मात्र, अमेरिकेने यावर कोणताही प्रतिसाद न दिल्याने चीन आता ही बाब जागतिक पातळीवर मांडू लागले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष चीनची मदत नाकारून अमेरिकेच्या जनतेचे जीव धोक्यात घालत असल्याचे चीन मधील सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे. आम्ही अमेरिकेला पाठवू इच्छित असलेली वैद्यकीय उपकरणे आणि औषधे ही शस्त्र असतील, ही अमेरिकेची भीती अनाठायी आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या नाकर्तेपणामुळे अमेरिकेचे नुकसान होणार आहे, असेही यात म्हटले आहे.


हेही वाचा – लॉकडाऊनमध्येही नफ्यातली इंडस्ट्री, कमावतेय घरबसेल्यांकडूनच


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -