घरदेश-विदेशचिंताजनक स्थिती! देशात २४ तासात १ लाख ६८ हजार ९१२ नव्या रुग्णांची...

चिंताजनक स्थिती! देशात २४ तासात १ लाख ६८ हजार ९१२ नव्या रुग्णांची नोंद

Subscribe

कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून गेल्या २४ तासात देशात १ लाखांहून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. देशात कोरोना संसर्गाला सुरुवात झाल्यापासून ही सर्वात मोठी रुग्णवाढ आहे. दरम्यान कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुण्गांच्या संख्येतही वाढ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेली आजची आकडेवारी देखील चिंता वाढवणारी आहे.

- Advertisement -

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गेल्या २४ तासांत झालेली रुग्णवाढ आणि मृतांची आकडेवारी जाहीर केली. नोंदवण्यात आलेली रुग्णसंख्या आत्तापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ ठरली आहे. २४ तासात १ लाख ६७ हजार ९१२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर या कालावधीत देशात ९०४ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ७५ हजार ८६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशात एकूण रुग्णसंख्या १ कोटी ३५ लाख २७ हजार ७१७ वर पोहचली आहे. तर मृतांचा आकडा १ लाख ७० हजार १७९ इतकी झाली आहे.

सप्टेंबर ऑक्टोबरनंतर कोरोना संसर्ग आटोक्यात आला होता. मात्र फेब्रुवारी २०२१ मध्ये देशात कोरोना रुग्ण झपाट्याने वाढू लागले. दिवसाला १० हजारांच्या सरासरीने रुग्ण आढळून येत होते. दरम्यान एप्रिलपर्यंत ही रुग्णसंख्या लाखांच्या घरात पोहचली आहे. एप्रिलमध्ये देशात १ लाखाहून अधिक रुग्ण आढळत आहेत. मागील तीन दिवसांमध्ये सलग दीड लाखांपेक्षा अधिक रुग्णवाढ झाली आहे.

- Advertisement -

देशातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र आढळत आहते. महाराष्ट्रात ५० हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत. महाराष्ट्राप्रमाणे इतर राज्यांमध्येही कोरोना स्थिती गंभीर होत आहे. दिल्ली, छत्तीसगढ, उत्तरप्रदेश, गुजरात, कर्नाटक राज्यांमध्ये मोठ्या संख्येने रुग्ण आढळत आहेत. याचपार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह दिल्लीमध्येही लॉकडाऊनची शक्यता वर्तवली जात आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -