CoronaVirus Impact: कोरोनामुळे अमेरिकेतील १ कोटी लोक बेरोजगार!

CoronaVirus Impact: कोरोनामुळे अमेरिकेतील १ कोटी लोक बेरोजगार!
CoronaVirus Impact: कोरोनामुळे अमेरिकेतील १ कोटी लोक बेरोजगार!

चीन मधील वुहान शहरात उद्यास आलेल्या कोरोना व्हायरसचा फैलाव अमेरिकेत मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहेत. अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवसे वाढत आहेत. कोरोनामुळे आता अमेरिकेत बेरोजगारीचे प्रमाण देखील वाढताना दिसत आहे. अमेरिकेतील श्रम मंत्रालयाच्या गुरुवारच्या आकडेवारीनुसार, शेवटच्या आठवड्यात म्हणजेच २८ मार्च रोजी ६६ लाख पेक्षा अधिक कामगारांनी बेरोजगार भत्त्यासाठी अर्ज केला आहे. अमेरिकच्या इतिहास पहिल्यांदाच आठवड्याच्या बेरोजगार भत्त्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात अर्ज आले आहे. गेल्या आठवड्यात ३३ लाख कामगारांनी बेरोजगारी भत्त्यासाठी अर्ज केला होता. त्यामुळे दोन आठवड्यात अमेरिकेतील बेरोजगारांची संख्या एक कोटींवर पोहोचली आहे. यापूर्वी १९८२ मध्ये अमेरिकेत एका आठवड्यात सर्वाधिक म्हणजे ६.९५ हजार लोकांनी बेरोजगारी भत्ता अर्ज केला होता.

वास्तविक अमेरिकेत बेरोजगारांची संख्या यापेक्षा जास्त असल्याच म्हटलं जात आहे. एका अहवालनुसार, बेरोजगारी भत्त्यासाठी अर्ज करण्यात अडचण आल्याची तक्रार बऱ्याच लोकांनी केली आहे. तसंच अर्ध काम करणाऱ्या कामगारांना आणि इतर श्रेणीत काम करणाऱ्या कामगारांना बेरोजगार भत्त्याची सुविधा मिळालेली नागी. बॅंक ऑफ अमेरिका मेरिल लिंचचे मुखअय अर्थशास्त्रज्ञ मिशेल मेयर म्हणतात, मंदीच्या एका महिन्यात आण तीन महिन्यात घडणाऱ्या गोष्टी, आता एका आठवड्यात घडत आहेत. कोरोना व्हायरसमुळे अमेरिकन कंपनी कर्मचाऱ्यांना कामावरून टाकत आहेत. या पुढील येणाऱ्या दिवसांमध्ये कदाचित कर्मचाऱ्यांना सरकारी सहायता निधीवर अवलंबून राहावे लागणार आहे.


हेही वाचा – CoronaVirus: जगभरात १० लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण!