coronavirus in china : चीनमध्ये कोरोनाची पुन्हा दहशत ; 26 शहरं लॉकडाउन

coronavirus in china 26 cities lockdown in china beijing
coronavirus in china : चीनमध्ये कोरोनाची दहशत कायम; २६ शहरं लॉकडाउन

चीनमध्ये कोरोना संसर्गाचा धोका वाढत असून तो रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. परंतु चीनला या महामारीतून बाहेर पडणे अवघड झाले आहे. दरम्यान कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी झिरो कोविड धोरण लागू केले आहे. हे धोरण कोरोना रुग्ण कमी करण्यासाठी असले ती आता ते चिनी नागरिकांसाठी क्रूरतेचे शस्त्र बनत आहे. त्यामुळे नागरिकांना आता कोरोनाची नाही तर लॉकडाऊनची भीती वाटत आहे.

अशा परिस्थितीतही चीनमध्ये आत्तापर्यंत 26 शहरं लॉकडाऊन करण्यात आली असून सुमारे 21 कोटी नागरिकांना घरात बंदिस्त रहावे लागत आहे. दरम्यान चीनमधील अनेक सार्वजनिक कार्यक्रमांवर देखील बंदी घातली जातेय. यामुळे चीनच्या सात दशकांच्या इतिहासात प्रथमच 1 मे हा कामगार दिनाचा कार्यक्रम साजरा होऊ शकला नाही.

दोन महिने शाळा बंद

चीनमधील झिजिंगयान, जिलिन, शांघाय, बीजिंगसह 8 प्रांतात तब्बल दोन महिन्यांपासून शाळा बंद ठेवण्यात आल्या आहे. या प्रातांमध्ये ओमिक्रॉनचे रुग्णांचे प्रमाण मोठ्याप्रमाणात आहे. दरम्यान जिनिपिंग सरकारने या प्रांतातील प्राथमिक शाळांमधील मुलांच्या कोरोना टेस्ट करण्याचे आदेश दिले आहे. यामुळे या मुलांच्या घरी जाऊन आता टेस्ट केल्या जात आहे.

कोरोनामुळे चीनमधील बहुतांश भागात याचा परिणाम जाणवत आहे. केवळ कोरोनाच्या सामूहिक चाचणीसाठी लोकाना बाहेर पडण्यास परवानगी दिली जातेय. यानंतर नागरिक शांघायमध्ये तर मॉलमध्ये खरेदीसाठी फिरताना दिसले. दरम्यान चीनची आर्थिक राजधानी शांघायमध्ये कडक लॉकडाउन असतानाही बीजिंगमध्ये कोरोनाचे रुग्ण कमी होत नाहीत. दरम्यान चीनमधील अनेक शहरात लॉकडाउन असल्याने नागरिकांचे खाण्यापिण्याचे हाल सुरु आहेत. त्यामुळे जिनिपिंग यांनी सुमारे 75 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना मदतकार्यात सहभागी केले असून त्यानुसार नागरिकांना अन्नधान्य वितरित केले जात आहे.


MSRTC strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे महामंडळाला 2824 कोटींचा फटका