घरताज्या घडामोडीLive Update: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळच्या आरेच्या जागेत वनसंपदेचे संवर्धन...

Live Update: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळच्या आरेच्या जागेत वनसंपदेचे संवर्धन करणार – मुख्यमंत्र्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

Subscribe

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळच्या आरेच्या जागेत वनसंपदेचे संवर्धन करणाऱ्याचा महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार आज २८६.७३२ हेक्टर अधिसूचित जागेचा ताबा आरे दुग्ध वसाहतीने वन विभागास प्रत्यक्ष सोपविला. आरे – १२५.४२२ हेक्टर, गोरेगाव- ७१.६३१ हेक्टर आणि मरोळ मरोशी-८९.६७९ हेक्टर जागा वन विभागाच्या ताब्यात देण्यात आली. याव्यतिरिक्त मरोळ मरोशी गावातील ४०.४६९ हेक्टर जागा यापूर्वीच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या ताब्यात देण्यात आली आहे.

- Advertisement -

मुंबईत सोमवारी ७२८ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर २८ जणांचा मृत्यू झाला आहे. (सविस्तर वाचा ) 

- Advertisement -

मध्य रेल्वेच्या भायखळा – सॅण्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाच्या दरम्यान माझगांव व डोंगरी यांना जोडणाऱ्या हँकॉक पुलाच्या पुनर्बांधणीतील महत्त्वाचा टप्पा असलेला दुसरा गर्डर टाकण्याचे आव्हानात्मक काम रविवारी पूर्ण करण्यात आले.


वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट
घेतली. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत विविध विषयांवर तसेच वैद्यकीय आणि सांस्कृतिक कार्य खात्याविषयी चर्चा केली.


पुण्यात सॅनिटायझर कंपनीच्या आगीत आतापर्यंत १७ जाणांचा मृत्यू


राज्यात २४ तासात १० हजार २१९ कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर २१ हजार ८१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आज १५४ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (सविस्तर वाचा ) 


मुख्यमंत्री आणि शरद पवार यांची बैठक सुरु


पुण्यात SVS सॅनिटायझर कंपनीच्या आगीत १४ जाणांचा मृत्यू. मृत्यू झालेल्यांमध्ये सर्व महिलांचा समावेश.


पुण्यात SVS सॅनिटायझर कंपनीला भीषण आग लागली आहे. आगीमुळे कंपनीतील १० ते १५ मजूर अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अग्निशमन दलाच्या ३ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.


कर्नाटकचे माजी मंत्री मुमताज अली खान यांचे निधन


पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना दिवाळीपर्यंत लागू राहणार – मोदी


भारत कोरोनाविरुद्धचे युद्ध जिंकणारच – मोदी


लसीकरणाबाबत जनजागृती करा,लसींबाबतच्या अफवांपासून सर्तक रहा. – मोदी


लस उत्पादन आणि चाचणी चालू ठेवण्याचे काम चालू आहे

आगामी काळात लसीचा पुरवठा वेगाने वाढणार आहे. देशात लस तयार करणार्‍या ७ कंपन्या आहेत, प्रगत टप्प्यात तीन लसीची चाचणी सुरू आहे. इतर देशांकडून लसी खरेदी करण्याची प्रक्रियाही वेगवान झाली आहे. मुलांसाठीही दोन लसींची चाचणी वेगवान सुरू आहे. देशातील अनुनासिक लसीवरही संशोधन केले जात आहे, सिरिंजऐवजी नाकाद्वारे लस दिली जाईल, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.


 

लसीकरणाची व्याप्ती आम्ही वाढवली

पंतप्रधान मोदी म्हणाले की २०१४मध्ये लसीचे व्याप्ती केवळ ६० टक्के होती, जर या वेगाने वाढ झाली असती तर देशाला लसी देण्यास ४० वर्षे लागली असती. आम्ही लसीकरण गती वाढविली आणि व्याप्ती देखील वाढविली, मुलांना या मोहिमेसाठी लसी देखील देण्यात आल्या. भारताला कोरोनाने घेरलं आहे, परंतु एकाच वर्षात भारताने दोन लसी बनवल्या आणि आतापर्यंत २३ कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत.


 

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना दिवाळीपर्यंत – मोदी


७५ टक्के लसी केंद्र सरकार विकत घेऊन मोफत देणार – मोदी


कोविन अँपची जगभर चर्चा – मोदी


भारतातील लसीकरणाचा वेग जगातील देशांपेक्षा अधिक आहे – मोदी


लसीकरणासाठी राज्यांना पैसे खर्च करावे लागणार नाही – पंतप्रधान


राज्यांकडे असेलेली २५ टक्के लसीकरणाची जबाबदारी भारत सरकार घेणार – मोदी


राज्यांकडे असेलेली लसीकरणाची सर्व जबाबदारी भारत सरकार उचलणार. येत्या दोन आठवड्यात नवीन गाईडलाईन जारी करणार – मोदी


२१ जून पासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना सर्व राज्यांना मोफत लसीकरण करणार – मोदी


केंद्र सरकारने राज्यांच्या अनेक मागण्या पूर्ण केल्या – पंतप्रधान


१६ जानेवारीपासून एप्रिल महिन्यापर्यंत लसीकरण मोहिम केंद्र सरकारच्या देखरेखीखाली झाले – मोदी


जगातील अनेक देशात लसीकरण उशिरा सुरु झाले – पंतप्रधान


ज्यांना कोरोनाचा सर्वाधिक धोका होता त्यांना पहिल्यांदा लस देण्यात आली – पंतप्रधान


नाकावाटेच्या नेसल वॅक्सिनवर भारतात संशोधन सुरू – पंतप्रधान


परदेशातून लस आणण्यावर भर – मोदी


देशातील ७ कंपन्यांमध्ये विवध लसींचे उत्पादन सुरु – पंतप्रधान


लस तयार करणाऱ्या कंपन्यांना हव तितकं सहाय्य केले – पंतप्रधान


प्रभावी लसीकरणासाठी देशाने मिशन इंद्रधनुष्य मोहीम राबवली – पंतप्रधान


येणाऱ्या काळात लसींचे उत्पादन वाढणार – पंतप्रधान


देशात शंभर टक्के लसीकरणासाठी ४० वर्षे लागली असती – मोदी


देशात २३ कोटी नागरिकांचे लसीकरण – मोदी


भारत मोठ्या देशांपेक्षा कमी नाही – पंतप्रधान


ऑक्सिजन उत्पादन वाढवण्यावर भर – पंतप्रधान


कोरोना विरोधातील लढाईत लसीकरण हे सुरक्षाकवच – मोदी


कोरोनामुळे आरोग्यव्यवस्थेसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते – पंतप्रधान


देशातील कोरोनाची लाट अद्याप संपलेली नाही – पंतप्रधान


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशवासियांशी संवाद


थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांशी साधणार संवाद


मराठा आरक्षणासंदर्बात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नवी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची उद्या भेट घेणार आहेत. यावेळी ते पंतप्रधान मोदी यांच्यासोबत मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करणार आहेत.


कोरोनाची दुसरी लाट मंदावत असून देशात आजपासून अनलॉक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. आता याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी ५ वाजता देशवासियांना संबोधित करणार आहेत.


ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार व्हेंटिलेटवर नाहीत तर ऑक्सिजन सपोर्टवर आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. काही चाचण्याच्या अहवालांची वाट पाहत आहोत, अशी माहिती मुंबईच्या पीडी हिंदुजा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिला.


निर्बंध शिथिल होताच मुंबईकर रस्त्यावर उतरले आहेत. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव या भागात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.


काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली.


मुंबई आजपासून अनलॉक होण्यास सुरू. यादरम्यान काय सुरू, किती वेळे सुरू असणार याबाबत जाणून घ्या


पाकिस्तानमध्ये दोन एक्स्प्रेस ट्रेनची धडक झाली असून भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातामध्ये ३० प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.


देशात २४ तासांत १ लाख ६३६ नवे कोरोनाबाधित आढळले असून २ हजार ४२७ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर १ लाख ७४ हजार ३९९ जण बरे होऊन घरी गेले आहेत. सविस्तर वाचा 


आजपासून मुंबईतील बस सेवा पुन्हा सुरू होणार आहेत.


जगभरात अजूनही कोरोनाचा कहर काही थांबला नाही आहे. वर्ल्डोमीटरनुसार, जगात आतापर्यंत १७ कोटी ४० लाख ३९ हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी आतापर्यंत ३७ लाख ४३ हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून १५ कोटी ७० लाख ४४ हजारांहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत.


राज्यात रविवारी १२ हजार ५५७ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर एकुण २३३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत आहे ही राज्यासाठी दिलासादायक बाब आहे. सविस्तर वाचा 


रविवारी मुंबईत ८६६ नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे मुंबईतील एकूण रुग्णांची संख्या ७ लाख १० हजार ८०७ इतकी झाली आहे. मृतांची संख्या मात्र काहीशी वाढली असून शनिवारी २९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मुंबईत आतापर्यंत नोंद करण्यात आलेल्या मृत्यूंची संख्या ही १५ हजार ०१८ इतकी झाली आहे. सविस्तर वाचा 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -