घरताज्या घडामोडीकोरोनाचा धसका! वडिलांना खांदा देण्यास मुलांचा नकार, आरोग्य कर्मचारी-पोलिसांनी दिला खांदा

कोरोनाचा धसका! वडिलांना खांदा देण्यास मुलांचा नकार, आरोग्य कर्मचारी-पोलिसांनी दिला खांदा

Subscribe

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या वडिलांना खांदा देण्यास मुलांनी नकार दिल्यामुळे आरोग्य कर्मचारी आणि पोलिसांना खांदा द्यावा लागला.

देशभर पसरणाऱ्या कोरोना विषाणूने अक्षरश: कहर केला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, याकारता देशात लॉकडाऊन करण्यात आले असून कोरोनाला आळा घालण्यासाठी व्यापक प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता लोकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, कोरोनाच्या धास्तीने चक्क मुलांनी आपल्या वडिलांना खांदा देण्यास नकार दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशमधील नोएडा याठिकाणी एका ६२ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यानंतर आरोग्य कर्मचारी, पोलीस आणि कुटुंबातील काही सदस्य मृतदेह घेऊन स्मशानात दाखल झाले. त्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी वडिलांना खांदा देण्यास सांगितले. मात्र, कोरोनाच्या धास्तीने मुलांनी खांदा देण्यास नकार दिला. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांनी पीपीई किट घालून पोलिसांच्या मदतीने मृतदेह दफन केला.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, ही व्यक्ती एका खासगी कंपनीत कामाला होती. अचानक या व्यक्तीची तब्येत खालावली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारा दरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

कुटुंबातील सदस्यांना केले क्वॉरंटाइन

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांना क्वॉरंटाइन करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेतला जात आहे.

- Advertisement -

२४ तासांत १२८ जणांचा मृत्यू

देशात गेल्या २४ तासांत १२८ जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात ५३, गुजरातमध्ये २१, बंगालमध्ये १४, दिल्लीत पाच, मध्य प्रदेशात चार, तामिळनाडूमध्ये तीन, राजस्थानात दोन आणि कर्नाटक, पंजाब, ओडिशा, बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि आंध्र प्रदेशात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.


हेही वाचा – CoronaVirus: देशात गेल्या २४ तासांत ३२७७ नवे रुग्ण; तर १२८ जणांचा मृत्यू


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -