घरताज्या घडामोडीपाकिस्तानात करोनाबाधितांच्या संख्येत वाढ; कर्जासाठी वर्ल्ड बँकेकडे मागितली मदत

पाकिस्तानात करोनाबाधितांच्या संख्येत वाढ; कर्जासाठी वर्ल्ड बँकेकडे मागितली मदत

Subscribe

पाकिस्तानमध्ये करोना बाधितांची संख्या २४५ वर पोहचली आहे. त्यामुळे पंतप्रधान इम्रान खान यांनी नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे.

आतापर्यंत जगभरातील करोना बाधितांची संख्या २ लाखांहून अधिक झाली आहे. त्यामुळे या करोना व्हायरसमुळे जगभरातील १३७ देशांना चिंताग्रस्त केले आहे. देशात देखील दिवसेंदिवस करोना बाधितांची संख्या वाढत आहे. भारताच्या शेजारी असलेल्या पाकिस्तानमधील करोना बाधितांची संख्या २४५ वर पोहचली आहे. त्यामुळे करोनावर नियंत्रण मिळवण्याकरिता सध्या पाकिस्तानात आरोग्य सुविधा सुधारण्याची आवश्यकता आहे. यासाठी पाकिस्तानने वर्ल्ड बँकेकडे मदत मागितली आहे. तात्काळ २० कोटी डॉलरचे कर्ज मिळवण्यासाठी वर्ल्ड बँकबरोबर पाकिस्तानची बोलणी सुरू आहे.

पाकिस्तानमध्ये करोना बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केलं आहे. इम्रान खान म्हणाले की, करोनाची चाचणी करण्यासाठी घाई करू नका, शांतता पाळा. करोनाची चाचणी करण्याची सुविधा अमेरिकेकडे सुद्धा नाही आहे. ज्यांना लक्षणे दिसतायत त्यांनीच फक्त रुग्णालयात जावे. सर्व जण आपण करोनाशी लढू आणि आपण ही लढाई जिंकू.

- Advertisement -

आतापर्यंत जगभरात २ लाखांहून अधिक करोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ७ हजार ९८९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ८२ हजार ०३७ जण रिकव्हर झाले आहेत. तसंच राज्यात करोनाची संख्या ४२वर पोहचली आहे. त्यामुळे करोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. तसंच मुंबई, पिंपरी-चिंचवड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या ठिकाणी जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे एकूणच पाहता जगभरात चिंतेचे वातावरण पसरले आहे.


हेही वाचा – Coronavirus: करोनाच्या धास्तीने लोकांची ऑनलाईन व्यवहाराला पसंती

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -