घरCORONA UPDATEकोरोनाच्या भितीने 'त्याने' बहिणीला घरी नेण्याचा निर्णय घेतला, पण वाटेत मृत्यूने गाठले!

कोरोनाच्या भितीने ‘त्याने’ बहिणीला घरी नेण्याचा निर्णय घेतला, पण वाटेत मृत्यूने गाठले!

Subscribe

किडणीच्या इलाजासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केलेल्या बहिणीला भावाने कोरोनाच्या भितीने हॉस्पिटलमधून घरी आणले आहे. पण घरी येतानाच वाटेतच बहिणीचा मृत्यू झाला. आता गावातील लोकं काय म्हणतील, काय प्रश्न विचारतील या भितीने त्याने आपल्या बहिणीचा मृतदेह जंगलात नेऊन पुरण्याचा प्रयत्न केला. मात्र जंगलात हत्ती आल्यामुळे त्याला मृतदेह टाकून पळावे लागले.

रविवारी रात्री पोलिसांना झाडांमध्ये हा मृतदेह सापडला. तिरछा पुल येथे एका कापडाता गुंडाळलेला हा मृतदेह होता. पोलिसांना मृतदेहाच्या जवळ एम्स रूग्णालयाची कागदपत्र मिळाली. त्यावरून पोलिसांनी घर गाठले. घरात कोणीच नव्हते. मुलीच्या आई वडिलांचा या आधीच मृत्यू झाला आहे. हे पोलिसांना समजले. पोलिसांनी सोमवारी भावाला ताब्यात घेतले. त्यावेळी भावाने घडला हा प्रकार पोलिसांना सांगितला. सोमवारी रात्री पोस्टमार्टमनंतर चंडीघाट येथे भावाच्या उपस्थितीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

- Advertisement -

१४ एप्रिलला एम्समध्ये दाखल केलं होतं

पोलिसांनी भावाची चौकशी केली असता, भावाने सांगितले की, १४ एप्रिलला त्याने बहिणीला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याचदरम्यान तेथे कोरोनाचे पाच रूग्ण आले. त्यामुळे त्याला आणि बहिणीला कोरोना होईल अशी भिती त्याला वाटू लागली. त्यामुळे १० मेला बहिणाला हॉस्पिटलमधून घरी नेण्याचा निर्णय घेतला. पण रस्त्यात बहिणीची तब्येत बिघडील आणि तीचा मृत्यू झाला. गावातील लोकांच्या भितीमुळे मी तिरछा पुलाजवळ शव पुरत होतो. त्यावेळी तीथे हत्ती आला म्हणू मी पळालो.


हे ही वाचा – हॅट्स ऑफ! ९ महिन्यांची गर्भवती असतानाही ती करतेय रूग्णांची सेवा!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -