घरCORONA UPDATECoronavirus India Update: पॉझिटिव्ह बातमी! देशातील रिकव्हरी रेट ९५.६४ टक्क्यांवर; ७५ दिवसांनंतर...

Coronavirus India Update: पॉझिटिव्ह बातमी! देशातील रिकव्हरी रेट ९५.६४ टक्क्यांवर; ७५ दिवसांनंतर नव्या रुग्णसंख्येत लक्षणीय घट

Subscribe

देशात कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव मंदावत आहे. त्यामुळे नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट होताना दिसत आहे. परंतु मृत्यूची संख्येत अजूनही कमी होताना दिसत नाही आहे. तरीही देशातील जनतेला दिलासा देणारी बाब म्हणजे पॉझिटिव्ह रेट वाढला आहे. देशात ७५ दिवसांनंतर गेल्या २४ तासांत ६० हजार ४७१ नवे कोरोनाबाधित आढळले असून २ हजार ७२६ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. तर १ लाख १७ हजार ५२५ रुग्ण बरे होऊन घरी गेले, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.

आता देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या २ कोटी ९५ लाख ७० हजार ८८१वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ३ लाख ७७ हजार ३१ जणांचा मृत्यू झाला असून २ कोटी ८२ लाख ८० हजार ४७२ जण कोरोनामुक्त झाले आहे. तर सध्या देशात ९ लाख १३ हजार ३७८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत २५ कोटी ९० लाख ४४ हजार ७२ जणांचे लसीकरण पार पडले आहे.

- Advertisement -

देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.६४ टक्क्यांवर पोहोचले आहे. आठवड्याचा पॉझिटिव्हीटी रेट घसरला असून तो ५ टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे. सध्या ४.३९ टक्के आहे. तसेच दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट ३.४५ टक्के झाला आहे. गेल्या ८ दिवसांपासून ५ टक्क्यांपेक्षा दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट कमी आहे.

- Advertisement -

१४ जूनपर्यंत देशात ३८ कोटी १३ लाख ७५ हजार ९८४ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत. यापैकी काल, सोमवारी दिवसभरात १७ लाख ५१ हजार ३५८ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -