घरदेश-विदेशLive Update :  म्हाडा वसवणार नवे दरडग्रस्त तळीये गाव, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र...

Live Update :  म्हाडा वसवणार नवे दरडग्रस्त तळीये गाव, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची घोषण 

Subscribe

म्हाडा वसवणार नवे दरडग्रस्त तळीये गाव, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची घोषण


पावसाचं परिमाण कोणीही ठरवू शकत नाही, जल आराखडा तयार करणार, तळीये दरडग्रस्त नागरिकांचे सुरक्षितस्थळी पुर्नवसन करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तळीये गावाला भेट देऊन पाहणी केली. अतिशय दुर्गम भागातील या गावात शासन सर्व मदत करेल असे ग्रामस्थांना सांगितले. दरड पडलेल्या ठिकाणी पाहणी करत असून त्यांच्याबरोबर मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री आदिती तटकरे तसेच खासदार सुनिल तटकरे हे देखील उपस्थित आहेत. मुख्यमंत्री पाहणी करत असताना जोरदार पावसाला सुरुवात.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तळीये गावात दाखल

- Advertisement -

रायगडच्या हिरकणी वाडीत मोठी दरड कोसळली, दरड कोसळल्याने ग्रामस्थ भयभीत


देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना फोन करत राज्य़ातील पूरपरिस्थितीचा आढावा घेतला, तर महाराष्ट्रातील पूरपरिस्थितीवर व्यक्त केली चिंता


मोठा निर्णय ! पूरग्रस्त भागात सरकार तांदुळ, डाळ, केरोसिन देणार – उपमुख्यमंत्री


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेलिकॉप्टरने महाडमधील पूरग्रस्त तळीये गावाकडे रवाना

cm uddhav thackeray to visit landslide mahad taliye village
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेलिकॉप्टरने महाडमधील पूरग्रस्त तळीये गावाकडे रवाना

आंबेघरमध्ये अद्याप प्रशासनाची मदत पोहचली नाही, स्थानिक नागरिकांकडून मदत कार्य सुरु, तीन मृतदेह ढिगाऱ्याखालून काढण्यात आले आहेत.


Tokyo Olympics : भारताची वेटलिफ्टर मीराबाई चानूची रौप्य कमाई


मुख्यमंत्री महाडच्या तळीये दौऱ्यासाठी मातोश्रीवरून रवाना


महाड पूरग्रस्त भागातील जखमी नागरिकांची भेट घेण्यासाठी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत  जे.जे.रुग्णालयात दाखल


मदत व पुनर्वसन विभागाने आज सकाळी दिलेल्या माहितीनुसार पूरग्रस्त भागातून सुमारे ९० हजार लोकांना सुखरूपपणे बाहेर काढले आहे. एकूण ७६ मृत्यू झाले असून ७५ जनावरांचे मृत्यू आहेत. एकंदर ३८ लोक जखमी असून तीस लोक बेपत्ता आहेत.


गेल्या २४ तासात भारतात ३९ हजार ९७ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ५४६ रुग्णांना प्राण गमवावे लागले. तर काल देशात ३५ हजार ८७ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज महाड तळीये गावातील दरड दुर्घटनेची करणार पाहणी, दुपारी १२.३० वाजता हेलिकॉप्टरने ते तळीये गावात रवाना होती. त्या पाहणी दौऱ्यात ते दुर्घटनाग्रस्त नागरिकांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे हे आज दुपारी 12 वाजता मुंबईहून हेलिकॉप्टरने महाडकडे रवाना होत आहेत. महाड येथील एमआयडीसी हेलिपॅड येथे पोहोचून ते वाहनाने तळीये गावासाठी रवाना होतील. दुपारी १.३० वाजता तळीये येथे पोहचून ते दुर्घटनाग्रस्त गावाची पाहणी करतील. दुपारी ३.२० वाजता ते परत महाड होऊन मुंबईकडे हेलिकॉप्टरने रवाना होतील.


बांदा गाळेल- सटमटवाडीत दरड कोसळल्याने ढिगाऱ्याखाली दुचारी चालक अडकला


दोन डोस घेतलेल्या नागरिकांना रेल्वे प्रवासाची परवानगी द्या, भाजपाची मागणी, बोरिवली पश्चिम रेल्वे स्थानकात भाजपाचे नेते प्रविण दरेकर यांच्या नेतृत्त्वाखाली या आंदोलनाला सुरुवात झाली आहे.


कोल्हापूरातील आंबेवाडी गावात रेस्क्यू ऑपरेशन सुरु, शेकडो घरात अद्याप लोक अडकून, पाण्याची पातळी सतत वाढतेय.


बारामतीतीली वीर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु, आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा, पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता


पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ


तळीये गावातील दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील जखमींना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
१) स्वप्नील शिरावले
२) स्वाती कोंडाळकर
३) रेश्मा कोंडाळकर
४) संगीता कोंडाळकर

पोलादपूर – सुतारवाडी
१) नीलिमा सुतार
२) भरत सुतार

अशी जखमींची नावे आहेत. यात तळीये गावात आज पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात, अनेक मृतदेह वाहून गेले, तर एनडीआरएफकडून ढिगाऱ्याखाली दबलेल्यांचा शोध अद्याप सुरु आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -