घरताज्या घडामोडीLive Update: वरळी येथील इमारत लिफ्ट दुर्घटनेत मृतांचा आकडा गेला ६ वर

Live Update: वरळी येथील इमारत लिफ्ट दुर्घटनेत मृतांचा आकडा गेला ६ वर

Subscribe

वरळी येथे शनिवारी अंबिका बिल्डरच्या निर्माणाधिन इमारतीमध्ये काम सुरु असताना लिफ्ट कोसळून ५ कामगारांचा मृत्यू झाला होता तर एकजण गंभीर जखमी झाला होता.
या गंभीर जखमी लक्ष्मण मंडल (३५) चा आज केईएम रुग्णालयात उपचार सुरू असताना रविवारी सायंकाळच्या सुमारास मृत्यू झाला. त्यामुळे आता या दुर्घटनेतील मृतांची संख्या ६ झाली आहे.


हिमाचल प्रदेशच्या किन्नौर येथे भूस्खलन होऊन मोठी हानी झालीय. या दुर्घटनेवर पंतप्रधान मोदींनी दु:ख व्यक्त केले. हिमाचल प्रदेशमध्ये झालेली दुर्घटना अत्यंत दु:खी आहे. ज्यांनी यात प्राम गमावले त्यांच्या कुटुंबीयाबद्दल मी मनापासून संवेदना व्यक्त करतो. तसेच अपघातात जखमी झालेल्याच्या उपाचारासाठी सर्व व्यवस्था केली जात आहे,असे मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

- Advertisement -


आज राज्यात ६,८४३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून राज्यात ५,२१२ रुग्णांची कोरोनावर यशस्वी मात केलीय. तर राज्यात आज १२३ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

मुंबईत गेल्या २४ तासात ३६२ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आलीय. तर १० रुग्णांचा मृत्यू झालाय. मुंबईत सध्या ५ हजार ६१० अँक्टिव्ह रुग्ण आहेत. मुंबईत आज कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ५३९ इतकी आहे.


कोल्हापूरात राधानगरी धरण आणि लक्ष्मी तलावाचे ३ व ६ नंबरचे दरवाजे उघडले असून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा कोल्हापूर पोलिसांकडून देण्यात आलाय.


महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरुच आहे. सांगली जिल्ह्यात जोरदार पावसाने पाणी जमा झाले असून सांगलीत दुकाने, वाहने अर्ध्यापर्यंत पाण्यात गेली आहेत.


NCB ची शनिवारी रात्री मुंबईत ३ ठिकाणी छापेमारी. या ठिकाणी ६ जणांना NCB ने ताब्यात घेतले आहे. त्याचप्रमाणे छापेमारीत मोठ्या प्रमाणात पैसे आणि ड्रग्ज जप्त करण्यात आलेत.


हिमाचल प्रदेशच्या किन्नौर जिल्ह्यात दरड कोसळून ९ जणांचा मृत्यू, ३ जण जखमी

हिमाचल प्रदेशच्या किन्नौर जिल्ह्यात दरड कोसळल्यामुळे बत्सेरी पूल पूर्णपणे तुटला आहे. पूलाशेजारी असलेल्या वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला असून ३ जण गंभीर गखमी झालेत.  रेस्क्यू टीम त्वरित घटनास्थळी दाखल झाली आहे.


 

 

संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना पूरग्रस्तांना त्वरित अन्न, औषध, कपडे आणि इतर आवश्यक वस्तू पुरवण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश


रायगडमधील तळीये गावात बचाव आणि शोध मोहीम अद्याप सुरू. आतापर्यंत एकूण 43 मृतदेह बाहेर काढण्यात यश


 

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मिरगाव येथे घडलेल्या दुर्घटनेत सहा जणांचे मृतदेह काल एनडीआरएफ आणि ग्रामस्थांनी बाहेर काढले. अद्यापही सहा लोक अडकल्याची शक्यता


कृष्णा नदीचे पाणी जवळच्या खेड्यात शिरले. आतापर्यंत 700-800 लोकांची सुटका


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्त चिपळूणला भेट दिली. नुकसानाचे प्रमाण व सध्या सुरू असलेल्या मदत कारभाराचा आढावा घेण्यासाठी अधिकारी व स्थानिक प्रतिनिधींची घेतली भेट.


कुलगाम जिल्ह्यातील खुडवानी भागात दहशतवाद्यांनी पोलीस हवालदाराकडून एके-रायफल हिसकावली


केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रायगडमधील तळीये स्थळाला दिली भेट


तळीये दुर्घटनेत ज्यांची घरे जमीनदोस्त झाली आहेत. त्यांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे बांधून देण्यात येणार आहेत. स्थानिक नागरिक सांगतील तिथेच त्यांचं पुनर्वसन करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज केली.


बाजारपेठ परिसरात पुराच्या पाण्यामुळे मोठे नुकसान झाल्यासंदर्भात चिपळूण बाजारपेठ आणि व्यावसायिक यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी चिपळूणात घरोघरी जाऊन नुकसानाची पहाणी देखील केली. मुख्यमंत्र्यांनी स्थानिकांसह संवाद साधल्यानंतर स्थानिक प्रशासनासोबत महत्त्वपूर्ण बैठक घेणार. ही आढावा बैठक चिपळूण येथील हॉटेल अभिषेकमध्ये होणार आहेत.


वरळी लिफ्ट दुर्घटना प्रकरणी नारायण मल्हार जोशी मार्ग पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा बांधकाम साईट सुपरवायझर स्वप्नील म्हामुणकर आणि कंत्राटदार मुकेशभाई पारसिया यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना रात्री उशिरा अटक


पंतप्रधान मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवार मन की बातद्वारे संवाद साधत असतात. आज ७९ वी मन की बातमधून त्यांनी देशवासीयांशी संवाद साधला. ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंना तिरंगा घेऊन चालताना बघून केवळ मीच नाही, तर संपूर्ण देश रोमांचित झाला होता. त्याक्षणी, संपूर्ण देशाने जणू एकत्र येत, आपल्या या योद्ध्यांना विजयी भव म्हटले, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑलिम्पिक खेळाडूंना प्रोत्साहन दिले आहे.


तळीये दुर्घटना प्रकरण, चौथ्या दिवशी रेस्क्यू ऑपरेशनमध्ये ४३ मृतदेह हाती


देशात गेल्या २४ तासात ३९,७४२ नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे तर ५३५ जणांनी आपला जीव कोरोनामुळे गमावल्याचे समोर आले आहे. दिलासादायक बाब म्हणजे गेल्या २४ तासात बाधितांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या अधिक असून ३९ हजार ९७२ जण कोरोनातून बरे झाले आहेत.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महाड येथील दरड कोसळलेल्या घटनास्थळांना भेट देऊन पाहणी केली. यावेळी, तेथील नागरिकांना धीर दिला. तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमच्यासोबत असल्याचे सांगत पुनर्वसन करण्याचे आश्वासनही दिलं. त्यानंतर, मुख्यमंत्री आज चिपळूण दौऱ्यावर राहणार आहेत. सकाळी १० वाजता मुंबईहून हेलिकॉप्टरने चिपळूणसाठी रवाना होतील


सांगलीकर आणि कृष्णा नदी काठी राहणाऱ्या नागरिकांची धाकधूक आणखी वाढली आहे. कृष्णा नदीची पाणी पातळी तब्बल ५४.५ फुटांपर्यंत वाढल्याची माहिती मिळतेय. २००५ साली ५३ फुटांची महापुराची पातळी नदीने रात्री ओलांडली होती. त्यानंतर यावर्षी ओलांडल्याचे सांगितले जात आहे.


मुंबईत वरळीत लिफ्ट कोसळून पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वरळीतल्या हनुमान गल्लीतील अंबिका या इमारतीत ही घटना घडली असून एक जण गंभीर जखमी आहे. जखमीला रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. वरळीतील अंबिका १९ मजली इमारत आहे. या इमारतीचं काम सुरू होतं. १९ व्या मजल्यावर काम करत असताना लिफ्ट कोसळून झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी आहे.


मुंबई गुन्हे शाखेने राज कुंद्राच्या व्हियान व जेएल स्ट्रीमच्या कार्यालयात पुन्हा छापा टाकला. यावेळी त्या कार्यालयात गुन्हे शाखेला एक कपाट सापडले आहे. क्राइम ब्रँचला या कपाटातून बऱ्याच बॉक्स फायली आढळल्यात.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -