घरताज्या घडामोडीLive Update: मुंबईत मागील २४ तासात ३४० कोरोनाबाधितांची नोंद, ४०३ रुग्णांची कोरोनावर...

Live Update: मुंबईत मागील २४ तासात ३४० कोरोनाबाधितांची नोंद, ४०३ रुग्णांची कोरोनावर मात

Subscribe

मुंबईत मागील २४ तासात ३४० कोरोनाबाधितांची नोंद, ४०३ रुग्णांची कोरोनावर मात


जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना डिस्चार्ज मिळणार, ब्रीच कँडी रुग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात आली असून प्रकृती उत्तम

- Advertisement -

राज्यातील ११ जिल्ह्यांना सोडून इतर जिल्ह्यांत निर्बंध शिथिल करणार – राजेश टोपे

राज्यातील ११ जिल्ह्यांचा समावेश तिसऱ्या टप्प्यात करण्यात आला आहे. पुणे, सोलापूर, रायगड, सिंधुदूर्ग, बीड, अहमदनगर, कोल्हापूर,

- Advertisement -

लोकलबाबत तुर्तास निर्णय नाही, लग्न समारंभ १०० लोकांच्या संख्येनं करता येण्याबाबत शिफारस करण्यात आली असून दोन दिवसांत निर्णय होईल – राजेश टोपे

कोरोना पॉझिटिव्हिटी रेट कमी असलेल्या जिल्ह्यांत शिथिलता देण्यात येणार

राज्यात शनिवारी दुपारी ४ वाजेपर्यंत दुकाने सुरु राहणार – राजेश टोपे


आमदार राजेंद्र राऊत यांच्या दोन्ही मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापुरात लग्न सोहळ्यामध्ये मोठी गर्दी झाली होती. कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांना दिलासा, EWS कोट्यातील विद्यार्थ्यांना १० टक्के आरणक्षण

अखिल भारतीय कोट्यात ओबीसींना २७ टक्के आरक्षण


निर्बंध शिथिल करण्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे संकेत

अर्थचक्र सुरू राहण्यासाठी शिथिलता गरजेची, ५० टक्के क्षमतेने ऑफिस सुरू करता येणार, सलून पार्लर, रेस्टॉरंट जास्त संख्येने सुरू करणे शक्य – राजेश टोपे


ममता बॅनर्जी नितीन गडकरींच्या निवास्थानी दाखल

दिल्ली दौऱ्यावर असणाऱ्या ममता बॅनर्जींच्या राजकीय गाठीभेटींचा सिलसिला सुरू ममता बॅनर्जी नितीन गडकरींच्या निवास्थानी दाखल झाल्या आहेत. शरद पवार आणि संजय राऊत यांची देखील भेट घेण्याची शक्यता


शिल्पा शेट्टीच्या आईची फसवणूक केल्याचेएक प्रकरण पुढे आले आहे. शिल्पा शेट्टीची आई सुनंदा शेट्टी यांनी मुंबईच्या जुहू पोलिस स्थानकात जमीन व्यवहार प्रकरणात फसवणूक झाल्याची तक्रार दाखल


 

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनची प्रकृती गंभीर


मुंबई एनसीबीने बुधवारी शहरातील दोन ठिकाणी घातला छापा. अंधेरीतील एका हॉटेलमधून महिला ड्रग पेडलरला अटक


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यातील सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी कोव्हिड टास्क फोर्सबरोबर बैठक घेणार


देशात गेल्या २४ तासात ४३ हजार ५०९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली तर ३८ हजारांहून अधिकांना कोरोनावर मात केली


गेल्या काही दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळला. त्यामुळे अनेक भागात पावसामुळे गंभीर पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्याने नदी काठावरील गावांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शासन स्तरावरून पुरग्रस्तांना तात्काळ दिलासा देण्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात यावी या साठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केल्याची माहिती कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी दिली.


महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत पुरामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यास आज कोकण दौऱ्यावर


मुंबईजवळ दहीसर परिसरात बुधवारी २८ जुलैला संध्याकाळी हा सर्व थरार झाला. पैसे मागण्याच्या वादातून चार तृतीयपंथींयांचा वाद झाला आणि त्यांचे रूपांतर हाणामारीत झालं. या चारपैकी दोघांनी एका तृतीयपंथीवर थेट चाकूहल्ला केला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -