घरताज्या घडामोडीLive Update: शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन

Live Update: शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन

Subscribe

शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन, सोलापूरच्या रुग्णालयात सुरु होते उपचार यावेळी त्यांवर शस्त्रक्रिया झाली होती.


ठाण्यात परमबीर सिंग, डीसीपी देवराज,कोथिंमिरे यांच्यावर तिसरा गुन्हा दाखल

- Advertisement -


राज्यात आज ६,६०० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर २३१ मृत्यू, राज्यात आज ७ हजार ४३१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

- Advertisement -

मुंबईत २४ तासांत नव्या कोरोनाबाधितांसह मृत्यूच्या संख्येत घट


ईडीकडून अनिल देशमुख आणि त्यांचा मुलगा ऋषिकेश देशमुखला नवीन समन्स जारी


देशात मॉर्डना लसीला मान्यता, डीसीजीयाने आपत्कालीन वापरासाठी दिली मान्यता, १८ वर्षावरील व्यक्तींसाठी वापरली जाणार लस


दिल्लीत ६३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद, ३ जणांचा कोरोनाने बळी


पूरग्रस्तांना तातडीची मदत तर दिलीच पाहिजे, मात्र यावर कायमस्वरुपी उपाय काढावा, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मागणी


शाहूपूरी ६ व्या गल्लीची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी

पूरबाधितांशी साधला आत्मियतेने संवाद. म्हणाले, घाबरू नका , काळजी करू नका. सध्या आपण कोरोनाशी लढतो आहे. संयम बाळगा. येथील लोकप्रतिनिधींशी चर्चा करून कुंभारगल्ली व परिसरातील पूरस्थितीवर मार्ग काढू .पूजा नाईकनवरे या स्थानिक रहिवाशी महिलेनी या आपत्कालीन स्थितीत पालकमंत्री सतेज पाटील यांनी खूप आधार दिला असल्याचे सांगितले. तर गणेश पाटील या स्थानिक रहिवाश्याने सांगितले की, यंदा २००५ व २०१९ पेक्षाही सध्या २०२१ साली आलेला पूर भयंकर असून शासनाने भरीव मदत करावी .


यमुना नदीच्या पाण्याची धोक्याची पातळी ओलांडली


कोल्हापुरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे-फडणवीस पहाणी करता करता एकमेकांना समोरा समोर भेटले


केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) बारावीचा निकाल आज दुपारी 2 वाजता होणार जाहीर


गेल्या दोन दिवसांपासून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देखील पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागाची पाहणी करताय. आज या दौऱ्याचा तिसरा दिवस असून सध्या ते चिखली गावात दाखल झाले आहेत.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे थोड्या वेळापूर्वी कोल्हापूर विमानतळावर दाखल झाले असून शिरोळकडे पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी रवाना


देशात गेल्या २४ तासात ४४,२३० नव्या बाधितांची नोंद करण्यात आली तर ५५५ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यासह दिवसभरात ४२ हजाराहून अधिकांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.


नागपूरसह संपूर्ण विदर्भात पुढचे चार दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय ठाणे, रायगड, पुणे आणि साताऱ्यात येत्या तीन तासात मध्यम ते अती मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज


एक राज्य दुसऱ्या राज्यात जाण्यावर निर्बंध घालतंय हे दुर्दैवी आहे – संजय राऊत


काश्मीरचा वाद संपवला तर इशान्येचा वाद सरकार का संपवत नाही – संजय राऊत


असा असेल मुख्यमंत्र्यांचा कोल्हापूर दौरा

सकाळी 10 वाजता:
मुंबईहून कोल्हापूर विमानतळ येथे विमानाने आगमन.

सकाळी 11. 20 :
शिरोळ नरसिंह वाडी येथे मोटारीने आगमन व पूर परिस्थितीची पाहणी

दुपारी 1 वाजता:
कोल्हापूर ६वी गल्ली नाईक अँड कंपनी या ठिकाणी आगमन व पुरामुळे बाधित भागाची पाहणी.

दुपारी 1.15 वाजता:
पंचगंगा हॉस्पिटल गंगावेश ते शिवाजी पूल रस्ता येथे पुरामुळे बाधित भागाची पाहणी.

दुपारी 2 वाजता:
कोल्हापूर शासकीय विश्रामगृह येथे जिल्हा प्रशासनासमवेत आढावा बैठक व त्यानंतर पत्रकार परिषद.

दुपारी 3 वाजता:
कोल्हापूर विमानतळाहून मुंबईकडे प्रयाण


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर असणार आहेत. उद्धव ठाकरे कोल्हापूरमधील पूर परिस्थितीची पाहणी करतील आणि प्रशासनासह आढावा बैठकही घेणार आहेत. उद्धव ठाकरे यांचा कोल्हापूर दौरा यापूर्वी हवामान विभागाने कोल्हापूरला रेड अ‌ॅलर्ट दिल्यानं रद्द करण्यात आला होता. मात्र आज सकाळी ८.४० वाजता मुख्यमंत्री कोल्हापूरकडे जाण्यासाठी मातोश्री निवासस्थानावरुन रवाना होणार असल्याचे सांगितले जात आहे.


कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील महापुरासंदर्भात पंचनामे अजून पूर्ण झाले नसून तातडीची मदत म्हणून गुरूपासून पूरबाधित ६० ते ७० हजार कुटुंबांच्या बँक खात्यात १० हजार रुपये जमा करण्यास सुरुवात करण्यात येणार आहे, अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. यासह पूरबाधित कुटुंबाना गहू, तांदूळ, डाळ आणि रॉकेलही मदत म्हणून दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.


विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये गेलेले आणि भोकरमधून निवडणूक लढलेले बापूसाहेब गोरठेकर यांची घरवापसी झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत गोरठेकरांनी पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -