घरताज्या घडामोडीLive Update: बसवराज बोम्मई होणार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री

Live Update: बसवराज बोम्मई होणार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री

Subscribe

बी.एस. येडियुरप्पा यांच्यानंतर बसवराज बोम्मई होणार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री (सविस्तर वाचा)


Mumbai Corona Update: मुंबईतील कोरोना रुग्ण मृत्यू संख्येत घट, २४ तासात ४६६ रुग्णांची कोरोनावर मात

- Advertisement -

नागपुरातील कोरोना संसर्गाचे लक्षणीयरित्या कमी झालेले प्रमाण, विविध छोटे व्यवसायी आणि दुकानदारांची हलाखीची स्थिती, वाढत असलेला रोष पाहता नागपुरात निर्बंधांमध्ये तातडीने शिथिलता देण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र


महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडून ७०१ कोटी रुपये मदतीची घोषणा

- Advertisement -

माजी आमदार गणपतराव देशमुख यांची प्रकृती चिंताजनक, देशमुख हे सांगोल्याचे आमदार असून शेकापचे नेते आहेत. देशमुखांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. गणपत देशमुख यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असून उपचार सुरु आहेत.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीला सुरुवात, राज्यातील पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या मदतीबाबत निर्णय होण्याची शक्यता, सह्याद्री अतिथीगृहात बैठक, आर्थिक पॅकेजची घोषणा होण्याची शक्यता


टीएमसी नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. (ममता बॅनर्जींनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, भेटीनंतर ममता बॅनर्जी म्हणाल्या…)


उपमुख्यमंत्री अजित पवार- विजय वडेट्टिवार बैठक सुरु, पूरग्रस्तांच्या मदतीबाबत चर्चा


मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्याच्या दिशेने रवाना, ठाणे येथे मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर ३ दिवसीय पुणे दौऱ्यासाठी रवाना


राज कुंद्राला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी


पूररेषेच्या पातळीच्यावर फ्लायओव्हर बांधण्याची नितीन गडकरींना विनंती करणार – अजित पवार


पूरग्रस्त भागात सध्या अत्यावश्यक सेवांसाठीच इंधन देणार – अजित पवार


अतिवृष्टीमुळे राज्यात मोठं नुकसान झालं असून राज्यभरात साधारण १६ हजार कुटुंबांना फटका बसला – शरद पवार


रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, कोल्हापुरात पुराने अतोनात नुकसान – शरद पवार


पूरपरिस्थितीची अहवाल आल्यानंतर राज्यसरकार अंतिम मदत जाहीर करणार- शरद पवार


१६ हजार किट आणि २५० डॉक्टरांचं पथक पूरग्रस्त भागात पाठवणार – शरद पवार


राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट १६ हजार कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूचे कीट वाटप करणार – शरद पवार


कोणत्याही नेत्यांनी प्रसंगावधान राखावं. मी सुद्धा आता दौऱ्यावर जात नाही. त्याचं कारण बाकीची यंत्रणा फिरवावी लागते. आपल्या भोवती यंत्रणा ठेवणं योग्य नाही. दौरे होत आहेत त्याने धीर मिळतो . पण दौऱ्यामुळं शासकीय यंत्रणेचं काम वाढतं. त्यामुळं दौरे होऊ नये –  शरद पवार


महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आज रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांच्या दौऱ्यावर


परमबीर सिंह यांच्याविरूद्ध एसीबीने कोणतेही एलओसी दिले नाही- अँटी करप्शन ब्युरो


भारतात  गेल्या २४ तासात २९ हजार ६८९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४१५ रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात ४२,३६३ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आज ठाणे पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक होणार आहे. ठाण्यातील सीकेपी हॉलमध्ये ही बैठक होणार आहे. या बैठकीत ठाणे महापालिका निवडणुकीसाठी मनसेचा मुख्य अजेंडा ठरण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पदाधिकाऱ्यांच्या जबाबदारीत मोठे फेरबदल होण्याचे संकेत असल्याचे सांगितले जात आहे.


आसाम आणि मिझोरम या दोन राज्यांतील नागरिकांमध्ये सीमावादावरुन संघर्ष सुरू आहे. नागरिक आणि सुरक्षा रक्षकांमध्ये झालेल्या झडपेमध्ये गोळीबाराची घटना घडली असून त्यामध्ये ६ पोलीस कर्मचारी मृत्यूमुखी पडले आहेत तर ५० कर्मचारी जखमी


उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापुरात दाखल झाले आहे. शाहूपुरी सहावी गल्लीची आज अजित पवार करणार पाहणी.


औरंगाबादमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी औरंगाबाद महापालिकेनं महत्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोना लस घेण्यासाठी औरंगाबादेतील अनेक केंद्रांवर मोठी गर्दी होत असल्याचं चित्र गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर अनेक तार रांगेत उभं राहावं लागतं. त्यामुळे अपंग, अपघातग्रस्त आणि आजारपणामुळे अंथरुणावर खिळलेल्या नागरिकांनी घरपोच कोरोना लस देण्याचा निर्णय औरंगाबाद महापालिका घेण्याच्या तयारीत.


राज कुंद्रा यांच्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी


कृष्णा नदीची पातळी ५ फुटाने ओसरली

कृष्णेची पातळी ५ फुटाने ओसरली असून आयर्विन पुलाजवळ ५५ फुटांवरून आता पाणी पातळी ५० फुटापर्यंत ओसरली आहे.


ठाण्यातील मुंब्रा येथे इमारतीचा काही भाग खचला

ठाण्यातील मुंब्रामध्ये ठाकूरपाडा नजिक असलेल्या ८ मजली स्वस्तिक इमारतीतील ४० खोल्या सुरक्षेच्या कारणासाठी सील करण्यात आल्या आहेत. इमारतीच्या गेट समोर नाल्याच्या बाजूला मोठं भगदाड पडल्यामुळे या इमारतीतील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं. रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली असल्याचे सांगितले जात आहे.


पुणे महापालिकेकडून पूरग्रस्तांना मदत; विविध विभागाकडून मदत पथके रवाना

राज्यातील पूरग्रस्त भागात झालेल्या नुकसान पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेनेही विविध विभागातील पथके कोल्हापूर, सांगली, मिरज, कुपवाड आणि रायगड या ठिकाणी मदतीसाठी पाठवली आहेत.


कोकण, पश्चिम महाराष्ट्राला आर्थिक मदत करण्यासाठी तयारी सुरु झाली असून पुरपरिस्थितीत किती आर्थिक नुकसान झाले आहे, याचा आढावा घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहे. येणा-या कॅबिनेटमध्ये कोकण, पश्चिम महाराष्ट्राच्या आर्थिक अहवाल सादर करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार, अर्थखात्येच सचिव व अधिकारी यांच्यात उद्या बैठक होणार असल्याची माहिती मिळतेय.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -